adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पतीसह सासू, नणंदेच्या कोठडीत वाढ : फोरचुनर गाडीसह दुचाकी जप्त:- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात, सासरा,दीर अद्याप फरार.!

  पतीसह सासू, नणंदेच्या कोठडीत वाढ :  फोरचुनर गाडीसह दुचाकी जप्त:- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात, सासरा,दीर अद्याप फरार.!   संभाजी पुरीगो...

 पतीसह सासू, नणंदेच्या कोठडीत वाढ :  फोरचुनर गाडीसह दुचाकी जप्त:- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात, सासरा,दीर अद्याप फरार.!



 संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जमीन खरेदी करण्यासाठी मानसिक शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अटक केलेल्या पती,सासू व नणंद यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी (दि. 21) न्यायालयात हजर केले तिघांच्याही पोलीस कोठडीत 26 मे. पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष असणारा सासरा आणि दीर अद्याप फरार आहेत त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वैष्णवी यांचा पती शशांक राजेंद्र हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे अद्याप प्रसार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारणी सदस्यही आहे. वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी (16 मे.) राहत्या घरात गळफास घेतला होता. वैष्णवींचे वडील आनंद कस्पटे यांनी बावधन पोलीस ठाणेत फिर्याद दाखल केली होती. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनीही तपासाला चांगलीच गती दिली आहे. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी चांदीची भांडी देवुन लग्न देखील मोठ्या थाटमाटात पार पाडले होते. मात्र हगवणे कुटुंबीयांनी तिच्या चारित्र्यावरून वैष्णवीला शारीरिक व मानसिक त्रांस देणे चालू केले होते. पती सासू-सासरे नणंद दीर यांनी होण्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. या त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवी ने राहत्या घरी गळफास घेवुन आपले जीवन संपविले

No comments