adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू साठ्यावर पंढरपूरांत पोलिसांची दमदार कामगिरी, 30 बॉक्स दारू एकूण किंमत 1,50,672 /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ! पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी..!!

  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू साठ्यावर पंढरपूरांत पोलिसांची दमदार कामगिरी, 30 बॉक्स दारू एकूण किंमत  1,50,672 /-  रुपयांचा मुद्दे...

 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू साठ्यावर पंढरपूरांत पोलिसांची दमदार कामगिरी, 30 बॉक्स दारू एकूण किंमत  1,50,672 /-  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ! पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी..!! 


संभाजी पुरीगोसावी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज  दिनांक 29 जून 2025 रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये मौजे. पंढरपूर ते कुर्डूवाडी जाणारी रोडवर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेले पत्राशेड खोलीमध्ये मौजे भटुंबरे येथील गावाचे शिवारातील इसम नामे सतीश रामा वसेकर ( वय 41) रा. नारायण चिंचोली ता. पंढरपूर ) यांच्या वस्तीतील घरांमध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्या बाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी  तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील स्टाफसह छापा मारून एकूण 1,50,672 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मौजे भटुंबरे गावच्या शिवारांमध्ये मॅकडोनाल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण 30 बॉक्स देशी-विदेशी दारू त्याची किंमत एकूण रुपये 1,50,672 /- रुपये किंमतीचा दारूच साठा अवैध विक्री  करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत करून इसम नामे. सतीश रामा वसेकर ( वय 41) रा. नारायण चिंचोली ता. पंढरपूर जि. सोलापूर )  यांच्या विरोधांत मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

   सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर पीएसआय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवालदार मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकांने सदरची कारवाई केली आहे,

No comments