गावठ्ठी हातभट्टी दारु विक्रेत्यावर तोफखाना पोलीसांचा छापा.. तब्बल 35 कॅन तयार हातभट्टी नष्ट करण्यात यश सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- ...
गावठ्ठी हातभट्टी दारु विक्रेत्यावर तोफखाना पोलीसांचा छापा.. तब्बल 35 कॅन तयार हातभट्टी नष्ट करण्यात यश
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि २८):-गावठ्ठी हातभट्टी दारु विक्रेत्यावर तोफखाना पोलीसांनी छापा टाकून 35,000/- रु.किं.ची 350 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु नष्ठ केली आहे.तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमी मिळाली की, सर्जेपुरा चौक येथे एका पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला इसम नामे सागर भाऊसाहेब नागपुरे व एक महिला असे दोघेजण मिळुन गावठी हातभट्टीची तयार दारु विक्री करत आहे,अशी गोपनिय बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन योग्य ती खात्री करुन कारवाई करण्याबाबतचा पो.नि.आनंद कोकरे यांनी तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ योगेश चव्हाण यांनी लागलीच दोन पंचाना बोलावुन घेवून पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसमनामे सागर भाऊसाहेब नागपुरे,वय २६ वर्षे,रा.सर्जेपुरा, ता.जि.अहिल्यानगर हा व त्याच्या सोबत एक महिला हे दोघे मिळुन आले असुन त्यांच्याकडे 35,000/- रु.किं.ची 350 लिटर तयार गावठी हातभट्टीची तयार दारु 35 पांढ-या रंगाचे कॅनमध्ये 100 प्रति लिटर प्रमाणे मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल जागेवर नष्ठ करुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ६६६/२०२५, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ.सुनिल चव्हाण,पो.हे.कॉ.भानुदास खेडकर,पो.हे.कॉ.योगेश चव्हाण, पो.कॉ.सुमित गवळी,पो.कॉ. सतिष त्रिभुवन,पो.कॉ.सुजय हिवाळे,पो.कॉ.बाळासाहेब भापसे,पो.कॉ.सतिष भवर, पो.कॉ.कपिल गायकवाड,पो.कॉ दादासाहेब रोहकले,पो.कॉ महेश पाखरे यांनी केली आहे.

No comments