adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा ओम शांती केंद्रात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी! 50 रुग्णांचे पनवेल येथे यशस्वी प्रस्थान

  चोपडा ओम शांती केंद्रात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी! 50 रुग्णांचे पनवेल येथे यशस्वी प्रस्थान चोपडा (प्रतिनिधी) – संपादक हेमका...

 चोपडा ओम शांती केंद्रात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी!

50 रुग्णांचे पनवेल येथे यशस्वी प्रस्थान


चोपडा (प्रतिनिधी) –

संपादक हेमकांत गायकवाड 

ओम शांती परिवार चोपडा, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडी आणि आर. झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामध्ये चोपडा तालुक्यातील ५० रुग्णांना पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.


    संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडीच्या पुढाकाराने अशा वैद्यकीय सेवा चोपडा तालुक्यात सातत्याने राबवण्यात येणार आहेत. आगामी काळात हृदयविकारासंबंधी एन्जिओग्राफी आणि प्लास्टी शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

   याचबरोबर, संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडीच्या माध्यमातून लवकरच चोपडा तालुक्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळाव्यात, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे.

    आजच्या शिबिरात ओम शांती परिवार चोपडा यांचे विशेष सहकार्य लाभले. या सेवाभावी उपक्रमात संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडीचे अध्यक्ष डॉ. राहुल भाऊ चौधरी, डॉ. गौरव तायडे व त्यांचा मित्रपरिवार यांचा मोलाचा सहभाग होता.

     कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले:

भूपेंद्र सुरेश वाघ, प्रशांत प्रकाश कोळी, रोहन अमृत बाविस्कर, अक्षय भिका पारधी, किरण भिका भोई, कुणाल सोनार, पवन पांडुरंग धीवर, विजय बामणे, नेत्रा गोळवे, पल्लवी मळवी आदींचे सहकार्य लाभले.

  या शिबिरामुळे चोपडा तालुक्यातील गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले असून संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडीचे उपक्रम लोकाभिमुख आणि सेवाभावी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा ओम शांती केंद्राच्या संचालिका मंगला दीदी ,सारिका दिदी ,करिष्मा दिदी ,शितल दिदी आदींनी परिश्रम घेतले....

No comments