राष्ट्रवादी (A.P.) सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष पदी चांगदेव देवराय तर शहराध्यक्ष पदी दीपक कदम श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गा...
राष्ट्रवादी (A.P.) सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष पदी चांगदेव देवराय तर शहराध्यक्ष पदी दीपक कदम
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुक्याच्या अध्यक्षपदी कान्हेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते चांगदेव देवराय यांची तर श्रीरामपूर शहरातील पत्रकार दीपक कदम यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली तालुक्याचे माजी आमदार तथा पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष लहुजी कानडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले, पक्ष बळकटी साठी देवराय व कदम यांनी काम करणार असल्याचे यावेळी सांगितले त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष अरुण पा.नाईक, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक (नाना) कानडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष अभिजित लिपटे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वृत प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments