नरवाडे शेत शिवारात तडस या वन्य प्राण्याच्या धुमाकूळ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंबाडे ये...
नरवाडे शेत शिवारात तडस या वन्य प्राण्याच्या धुमाकूळ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंबाडे येथील शेतकरी निंबा धनगर यांचे नरवाडे शेतशिवारात शेत आहे व ते आपल्या शेतात रात्री ९ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी काढत होते त्यावेळी त्यांच्यावर तडस या वन्य प्राण्याने हल्ला केला निंबा धनगर हे ट्रॅक्टर वर असल्यामुळे त्यांनी तेथून पड काढत सुटका केली व घडलेली हकीकत गावातील लोकांना सांगितली.दुसऱ्या दिवशी नरवाडे येथील संदीप धनगर हे याच शेताच्या बाजूला असलेले दिनेश पाटील राहणार खरद यांच्या शेतात कोळपणी साठी गेले फाईल चित्र
असता त्यांच्यावर त्या प्राण्याने हल्ला केला संदीप धनगर हे गाड्यावर चढल्यामुळे त्यांची सुटका झाली व त्यांनी त्यांना सोडून तिथे बांधलेल्या बैलावर हल्ला केला व बैलाला गंभीर जखमी केले.नरवाडे अंबाडे शेत शिवारात शेतकऱ्यांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कामाला मजूर सुद्धा जात नाही त्यामुळे वनविभागाने सदरील वन्य प्राण्याला घेऊन जावे अशी मागणी जोर धरत आहे.
No comments