चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन . चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील ज्येष्ठ नागरिक ...
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन .
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला .
या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी राजयोगिनी अहिल्या देवी होळकरांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले .
या वेळी संघाचे सचिव विलास पाटीलसर खेडीभोकरीकर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या कर्तृत्वाचे ठळक विशेष सांगतांना वयाच्या २९ व्या वर्षी पती निधन, दोन मुलांना गमावणे अशा आघांतानी खचून न जाता खंबिरपणे उभे राहत मंदिरे - घाट -विहिरी बांधणे सम धार्मिक, सामाजिक जनहिताची सेवाभावी कामे, कणखर प्रशासकीय राज्यकारभार, महेश्वर - इंदूर या शहरांना सुंदर बनविणे अशा त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत राजयोगिनी अहिल्यादेवी होळकरांच्या सेवा कार्याला उजाळा दिला .
यावेळी संघाचे उपाध्यक्ष जे . एस् .नेरपगारे, कोषाध्यक्ष - दिलीपराव पाटील,सचिव - विलास पाटीलसर खेडीभोकरीकर, सहसचिव इंजि.विलास एस.पाटील, ज्येष्ठ संचालक एम.डब्ल्यू . पाटील, गोविंदा महाजन, राजेंद्र साळुंखे व संघाचे संचालक मंडळ, सदस्य उपस्थित होते .
No comments