लोणवडी येथे हिवताप जनजागरण मोहीम कीटकजन्य आजाराविषयी माहिती व उपाययोजना ची केली जनजागृती अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
लोणवडी येथे हिवताप जनजागरण मोहीम
कीटकजन्य आजाराविषयी माहिती व उपाययोजना ची केली जनजागृती
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- प्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी अंतर्गत उपकेंद्र लोणवडी येथे हिवताप जन जागरण मोहीम राबविण्यात आली दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी हिवताप,डेंगू,चिकणगुणीया, हत्तीरोग तसेच इतर किटकजन्य आजारा विषयी जनजागृती करण्याकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराजसिंग चव्हाण, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पांडे, होगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जैन मॅडम,वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप जन जागरण मोहीम राबविण्यात आली.हिवताप जन जागरण मोहीमे मध्ये आरोग्य सहाय्यक, श्री जाधव,श्री शेगोकार यांनी किटकजन्य आजाराविषयी मार्गदर्शन,हिवताप हा आजार कोणल्या डासामुळे होतो
याबद्दल सविस्तर माहीती दिली. त्याबाबत उपाययोजना काय कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले त्यात आपल्या घराभोवतालाचा परिसर स्वच्छ ठेवावा,अंगभरकपडे घालणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा,मच्छरदाणीचा वापर करावा,डास चावणार नाही अशा साधनाचा वापर करावा, गावात कुठे डबके साचले असतील तर त्यामध्ये गप्पी मासे सोडावे.ताप आल्यास रक्ताची तपासणी लवकर करावी व उपचार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.या मोहिमेत उपकेंद्राचे सीएचओ डॉ.सोहील खान,आरोग्य सेवक श्री.कैलास सरोदे,व श्री अनुप भोळे,तसेच आरोग्यसेविक आशा सेविका,अंगणवाडी सेविका हजर होत्या.



No comments