adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आ. अमोल जावळे यांचा तातडीचा पुढाकार : वादळग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

 आ. अमोल जावळे यांचा तातडीचा पुढाकार : वादळग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायक...

 आ. अमोल जावळे यांचा तातडीचा पुढाकार : वादळग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश



भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर व यावल तालुक्यात काल आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके जमीनदोस्त झाली असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तात्काळ पुढाकार घेत प्रशासनाला नुकसानग्रस्त गावांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधीकारी यांनी रावेर, यावल तालुक्यातील विवरे, चिनावल, रोझोदा तसेच यावल तालुक्यातील न्हावी या गावांना भेट देत, प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कृषी अधिकारी चंद्रकांत वाळके, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, तसेच सुरेश धनके, पद्माकर महाजन, सूर्यकांत देशमुख, वासू नरवाडे, प्रवीण वारके, पराग वाघुळदे आदी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देत आ. जावळे म्हणाले, “शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.”

No comments