adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोक क्रांती वाहतुक सेनेने शहर वाहतुक पोलिसांच्या टोईंग वाहनाचा गैरकारभार आणला चव्हाट्यावर

  लोक क्रांती वाहतुक सेनेने शहर वाहतुक पोलिसांच्या टोईंग वाहनाचा गैरकारभार आणला चव्हाट्यावर नाशिक (प्रतिनिधी):  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 लोक क्रांती वाहतुक सेनेने शहर वाहतुक पोलिसांच्या टोईंग वाहनाचा गैरकारभार आणला चव्हाट्यावर



नाशिक (प्रतिनिधी): 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वाहतुक सुरळीत रहावी व वाहन धारकांना शिस्त लागावी म्हणुन नाशिक शहर वाहतुक शाखेच्या वतीने नाशिक महानगरात गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त वाहन धारकांना शिस्त लागावी म्हणुन टोईंग व्हॅन कार्यान्वयीत केली आहे, परंतु या टोईंग वाहनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अधिकाराचा गैरवापर करून गैरकारभार केला जात असल्याचे सत्य लोक क्रांती वाहतुक सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निरज भालेराव यांनी जनते समोर आणले आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, नाशिक महानगरातील वाहन धारकांकडून पोलिस वाहतुक शाखेच्या टोईंग वाहनावरील कर्मचारी गैरकारभार करत असल्याच्या तक्रारी लोक क्रांती सेना प्रणित लोक क्रांती वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष निरज भालेराव यांच्याकडे आलेल्या होत्या. आलेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी निरज भालेराव यांनी पोलिस वाहतुक शाखेच्या टोईंग वाहनाचा पाठलाग केला. रस्त्यावर पार्कीग करणाऱ्या वाहनांचे फोटो या टोईंग वाहनावरील एक कर्मचारी काढत होता, टोईंग वाहन पुढे चालत होते. फोटो काढलेल्या गाडींची चर्चा सुरू झाली, तुमच्या गाडीचे फोटो काढण्यात आल्याचे प्रत्यक्ष दर्शी वाहन धारकांना सांगत होते वाहन धारक आपल्याला दंड पडू नये म्हणून सबंधीत टोईंग व्हॅनच्या मागे जात असल्याचे दिसले. फोटो काढलेल्या वाहन धारकांना फोटो दाखवुन सबंधीत वाहन धारकांकडून तडजोड करून पैसे उकळले जात असल्याचे चित्र समोर आले.वास्तविक अवैध पार्कीग असेल तर सबंधीत ठिकाणी टाईंग वाहनावरील कर्मचाऱ्यांनी पुकारा करून सबंधीत वाहन मालकाचा शोध घ्यायला हवा, सबंधीत वाहन मालक येत नसेल तर त्या वाहनाला जामर लावुन पुढे कारवाईसाठी रवाना व्हायला पाहीजे किंवा सबंधीत वाहन धारकांचा शोध घेऊन त्याला त्याचे वाहन अवैधपणे पार्कीग केल्याचे लक्षात आणुन दिले पाहिजे व त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे मात्र टाईंग वाहनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवुन दोन पैसे खिशात कसे जातील याचा प्रयत्न सबंधीत टोईंग वाहनावरील कर्मचारी करत असल्याचे दिसुन आले. लोक क्रांती वाहतुक सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निरज भालेराव यांनी सबंधीत टोईंग वाहन  थांबल्यानंतर तुमची कामाची पध्दत चुकत असल्याचे लक्षात आणून दिले व शहर वाहतुक पोलिस विभागातील कर्मचारी वाहतुकीचे किंवा वाहन चालवतांनांचे नियम कसे मोडतात हे लक्षात आणुन दिले. अवैध पार्किंग व टोंईंग वाहनाचे नियम सार्वजनिक करून नागरीकांना या नियमांची माहिती पोलिस विभागने करून द्यावी जन जागृतीसाठी शहराच्या किमान प्रमुख चौकांमध्ये नियमांची माहिती सांगणारे फलक नाशिक शहर वाहतुक पोलिस भागाने लावावे व टोईंग वाहनावर गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर करवाई करावी अशी मागणी लोक क्रांती वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष निरज भालेराव यांनी केली आहे.

No comments