Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी  अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळ...

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी 


अमळनेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता, अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम साने गुरुजी विद्या मंदिरात  घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी साने गुरुजीं शाळेतील शिक्षकांचा निरोप समारंभाचा देखील कार्यक्रम होता. तेथे बाजूला बसून, काँग्रेसचे मोजके कार्यकर्ते एकत्र येऊन, पहिल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट, इतिहास, त्यांनी केलेले कार्य, त्यांची प्रगल्भ विचारसरणी, याविषयी चर्चा झाली. त्यात अहिल्यादेवी होळकरांची  भगवान शंकरा वरची श्रद्धा, त्यामुळे त्यांनी कुशावर्त धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचा केलेला जिर्णोद्धार, हुंडा प्रथेला विरोध, विधवांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार, पशुपक्ष्यांना, माशांना (मासे) अन्न पुरण्यावरून, त्यांच्या भूतदयावर चर्चा झाली. अशा चर्चेत काँग्रेस तालुका अध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, प्रा. श्याम पवार, सुलोचना ताई वाघ, संदीप घोरपडे, प्रताप नगराज पाटील, गजेंद्र साळुंखे, राजेंद्र चौधरी सर, शरद नाना पाटील, के.व्हि.नाना पाटील, राजू भाट, शालिग्राम पाटील, लोटन मोतीराम पाटील, इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. व शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा पूजन करून, त्यांना मानाचा मुजरा देत कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments