adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा शेतकरी बांधवांशी साधला संवाद मोठा वाघोदयातील शेतकऱ्यांशी कृषीविषयक चर्चा

  केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा शेतकरी बांधवांशी साधला संवाद  मोठा वाघोदयातील शेतकऱ्यांशी कृषीविषयक चर्चा   रावेर प्रतिनिधी मुबार...

 केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचा शेतकरी बांधवांशी साधला संवाद 

मोठा वाघोदयातील शेतकऱ्यांशी कृषीविषयक चर्चा  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे आज केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज मोठा वाघोदा तालुका रावेर येथे भेट दिली भेटी दरम्यान त्यांनी मोठा वाघोदयातील शेतकरी बांधवांशी शेती विषयक चर्चा केली तसेच रासायनिक खते जैविक खते व बी बियाणे यांसह शेती करणार्या शेतकरी बांधवांना उद्भवणारे प्रश्न, विविध समस्या अडीअडचणी आणि त्यावर आवश्यक त्या उपाययोजना बाबत चर्चा करून माहिती जाणून घेतली यावेळी डॉ गुरुदत्त पाटील दिलीप बाजीराव पाटील सुरेश पाटील राहुल काशिनाथ पाटील राहुल गोपाल महाजन माजी  सरपंच तथा पत्रकार मुबारक उर्फ राजू तडवी हर्षल दिलीप पाटील रमाकांत महाजन सनी पाटील प्रविण पाटील आदी शेतकरी बांधवांसह मोठा वाघोदयातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तत्पूर्वी केंद्रीय राज्यमंत्री खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मोठा वाघोदा येथील माजी सरपंच अनिल रघुनाथ चौधरी यांचे मोठे बंधू प्रगतशिल शेतकरी संजय जगन्नाथ चौधरी यांचे अकस्मात निधन झाले त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनासाठी भेट चौधरी कुटुंबियांचे सांत्वन केले

No comments