पत्रकारावर हल्ला करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार,गावठी कट्ट्यासह कोतवाली पोलिसांनी आवळल्या मुसक्या सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-हेमक...
पत्रकारावर हल्ला करणारा निघाला कुख्यात गुन्हेगार,गावठी कट्ट्यासह कोतवाली पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१०):- पोलीस ठाण्याचे Can't अंमलदार वटपौर्णिमा सणाच्या अनुशंगाने हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दरम्यान पोकॉ.शिरीष तरटे व अतुल कोतकर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की,रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे (रा.वैष्णवनगर,केडगाव अहिल्यानगर) याच्या ताब्यात देशी बनावटीचे अग्निशस्र असुन तो त्या अग्निशस्राचे सहाय्याने रात्रीचे वेळी परिसरात दहशत करीत असुन तो काही वेळात वैष्णव नगर,केडगाव परिसरात येणार आहे.सदर बातमीबाबत पोलीस अंमलदार यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहीती देवून त्यांच्या आदेशाने स.पो.नि.कुणाल सपकाळे व पोलीस स्टाफ असे पंचासह कारवाई कामी रवाना झाले. रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे हा त्याच्या ताब्यातील 12,000/- रु किंमतीचे एक काळ्या रंगाचे देशी बनावटीचे अग्निशस्र व सोबत 400/- रु किं. चे दोन जिवंत काडतुसासह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस करता सदर अग्निशस्र हे रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज उर्फ सोमनाथ राजु केदारे, रा.केडगाव यांचेकडून आणले असल्याचे सांगितले. त्यावरुन नमुद दोन्ही आरोपी विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 543/2025 भारतीय शस्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 प्रमाणे दि. 10/06/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि. 06 जून 2025 रोजी सायंकाळी 07.00 वा.चे सुमारास पत्रकार श्री.अरुण बुधुराव नवथर, (सकाळ वृत्तपत्र पत्रकार) रा. नाथकृपा अपार्टमेंट, एकनाथ नगर, केडगाव, अहिल्यानगर यांचेवर त्यांचे रहाते अपार्टमेंटचे पार्कीगमध्ये एका अनोळखी इसमाने दगडाने,लाथाबुक्यांनी मारहान करुन शिवीगाळ, दमदाटी केली होती. त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 532/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115(2), 352 प्रमाणे दि. 06/06/2025 रोजी गुन्हा दाखल केला होता.पत्रकार यांचेवर झालेल्या हल्याचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग तसेच पोलीस निरीक्षक कोतवाली यांना पत्रकार हल्यातील अनोळखी आरोपी याचा लवकरात लवकर शोध घेवून कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले होते.फिर्यादी पत्रकार यांचे कडुन त्यांचेवर हल्ला करणारा अनोळखी आरोपी यांचे वर्णन प्राप्त करुन त्याबाबत गुप्तबातमीदार यांना माहीती देण्यात आली होती. त्यांचेकडुन आर्म अॅक्ट प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे, रा. वैष्णवनगर, केडगाव, अहिल्यानगर यानेच पत्रकार यांचेवर हल्ला केला असल्याचे खात्रीलायक समजल्याने त्याबाबत फिर्यादी पत्रकार यांना माहीती देवून आर्म अॅक्ट प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी दाखविला असता त्यांनी त्यास ओळखून याने मला दि. 06/06/2025 रोजी सायंकाळी माझे रहाते अपार्टमेंटचे पार्कीमध्ये माझेवर हल्ला करुन मारहान केल्याचे सांगितले. आरोपी मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत याचेकडे अधिक तपास करता त्याने पत्रकार यांना गुन्ह्याचे उद्देशाने त्यांचे पार्कीगमध्ये जावुन मारहान केल्याची माहीती दिली.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,स.पो.नि. कुणाल सपकाळे,पो.हे.कॉ. राजेंद्र औटी,पो.हे.कॉ. संदिप पितळे,पो.कॉ.दिपक रोहोकले, तानाजी पवार,दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे यांनी केली आहे.

No comments