adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घंटागाडीतून शहरभर फेरी – मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे अभिनव नेतृत्व संपूर्ण जिल्ह्याचे, राज्याचे लक्ष वेधणारे!

  घंटागाडीतून शहरभर फेरी – मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे अभिनव नेतृत्व संपूर्ण जिल्ह्याचे, राज्याचे लक्ष वेधणारे! चोपडा प्रतिनिधी (संपादक -...

 घंटागाडीतून शहरभर फेरी – मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे अभिनव नेतृत्व संपूर्ण जिल्ह्याचे, राज्याचे लक्ष वेधणारे!


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा शहरात मागील तीन दिवसांपासून संत धार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था, गटारांचे पाणी साचणे, व मलनिसारण प्रकल्पामुळे निर्माण झालेली तात्पुरती गैरसोय — अशा अडचणींचा सामना करत असताना, प्रशासनाचे नेतृत्व काय करतंय, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविकच मात्र आज शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी,चोपडा नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल पाटील साहेबांनी या सर्व प्रश्नांना एक वेगळीच दिशा दिली. त्यांनी कोणतीही औपचारिकता न करता, कोणत्याही प्रसिद्धीचा गाजावाजा न करता, सकाळी ६ वाजता थेट घंटागाडीतून शहराचा दौरा सुरू केला - हे दृश्य फक्त चोपडा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात, बहुतांशी राज्यात पहिल्यांदाच दिसले

ST कॉलनी, महावीर नगर, रामनगर, झोपडपट्टी परिसर, विवेकानंद नगर, यश पार्क या परिसरात सलग ५ तास त्यांनी ओला-सुका कचरा जनजागृती मोहिम राबवली. नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या, समस्या ऐकून तातडीने उपाय सांगितले. घंटागाडीतून फिरून, स्वच्छतेसाठी त्यांनी केलेली प्रत्यक्ष सहभागाची पद्धत, ही चोपडा नगरपरिषदेत नव्हे, तर प्रशासनात ‘सेवा’ या शब्दाला नवा अर्थ देणारी घटना ठरली.

मुख्याधिकारी स्वतः घंटागाडीत – हे दृश्यच राज्यातील बहुतांश शहरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरत आहे.

शासनाच्या सेवेत काम करत असताना, कर्तव्यासाठी झुकलेली मान, नागरिकांशी जोडलेली संवेदना, आणि प्रत्यक्ष कृतीने दिलेली आश्वासने — हे सगळं आज चोपड्याने पाहिलं.

खरंच,"नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणे नाही, तर लोकांमध्ये उतरून त्यांच्यासोबत चालणे असते!"

राहुल पाटील साहेबांचे हे पाऊल संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवा दिशादर्शक ठरू शकेल.

No comments