adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

समर्थ अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मस्कावद बु. येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्त सोहळा साजरा

  समर्थ अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मस्कावद बु. येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्त सोहळा साजरा  भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी (संपादक -:- ह...

 समर्थ अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मस्कावद बु. येथे शिवराज्याभिषेक दिना निमित्त सोहळा साजरा 


भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कौशल्य रोजगार ऊद्योजकता व नाविन्यता विभागाचे महाराष्ट्राचे मंत्री श्री मंगलप्रभातजी लोढा यांचे संकल्पनेतुन महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिवराज्याभिषेक दिन दिनांक ६ जुन रोजी साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन उदघाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी केले. त्यानंतर अप्पर मुख्यसचिव मा.मनिषा वर्मा (भाप्रसे) यांचा संदेश ऑनलाईन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. पृथ्वीराज चौधरी सचिव व्दारका फाऊडेशन व प्रमुख वक्ता श्री.व.पु. होले सर यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.पी.ई. पाटील यांनी शाल व बुके देऊन केला.


संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.पी.ई. पाटील यांनी प्रस्ताविक केले प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की ६ जुन १६७४ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा पार पडता होता. त्याचे हे ३५१ वे वर्ष आहे. शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक दिनी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले व त्याच दिवशी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवराज्याभिषेक हा अंत्यत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अंत्यत महत्वाचा प्रसंग होता. अशा शिवराज्याभिषेक दिना निमित्त आपल्या खात्याचे मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांचे संकल्पनेतुन आपण आजच्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजीत केले आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. व.पु. होले (साहित्यीक, आर्दश शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, सेक्रेटरी लेवा एज्यकेशन युनियन जळगांव) यांनी "कुंटुंब प्रबोधन" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदशन केले. समाजात कुंटूंब व्यवस्था कशी ढासळत आहे. हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. तसेच कुंटंबाची सांस्कृतीक जबाबदारी ही आईवर अवलंबुन असते. कुंटूंबातील मुळ सुस्कृत करण्याची जबाबदारी आईची असते असे त्यांनी सांगितले कुंटूंब प्रवोधन करतांना विद्यार्थ्यांची काय जबाबदारी आहे हे त्यांनी समजाऊन सांगितले

तसेच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूचे "तंत्रप्रदर्शन" आयोजीत करण्यात आले होते त्यात फिटरचे विद्यार्थी दिवक विलास पाटील व प्रतिक कुंदन भोगे यांनी हँड व्हाईस व मशिन काईस बनविण्यात आले होते. इलेक्ट्रीशियन चे विद्यार्थी पुर्वेश पंकज चोपडे व नैनेश सुभाष हरणकर जिना वायरिंग व सोलर लाईटिंग बनविण्यात आले होत.

सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील शिक्षक श्री. पराग रमेश बेंडाळे, एन.एम. ब-हाटे, श्री.गिरीष ढाके सर व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. शेवटी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.पी.ई. पाटील यांनी प्रमुख पाहुने श्री. पृथ्वीराज चौधरी व प्रमुख वक्ते श्री. व.पु. होले यांचे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments