adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैधरित्या उभारण्यात आलेल्या बिल्डींगवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा न.प. मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या तोंडाला काळे फासू -:- प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप

  अवैधरित्या उभारण्यात आलेल्या बिल्डींगवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा न.प. मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या तोंडाला काळे फा...

 अवैधरित्या उभारण्यात आलेल्या बिल्डींगवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा न.प. मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या तोंडाला काळे फासू -:- प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर न.प.हद्दीत येत असलेल्या चाळीसबिघास्थित आरोग्यम् हॉस्पीटलची बिल्डींग अवैधरित्या न.प.ची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आल्याबाबत अनेकदा तक्रारी व योग्य ती कागदपत्रे सादर करूनही न.प. प्रशासन सदर अवैध बांधकाम धारकास पाठीशी घालण्याचा प्रकार करीत आहे. तेव्हा सदर बांधकाम धारकावर तसेच अवैधरित्या उभारण्यात आलेल्या बिल्डींगवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अन्यथा न.प. मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी २४ जून रोजी न.प. प्रशासक तथा तहसीलदार व न.प. मुख्याधिकारी यांना एका निवेनाद्वारे दिला आहे. 


दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, न.प. हद्दीमध्ये चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित शांती  आरोग्यम् हॉस्पीलची बिल्डींग ही न.प.ची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता उभारण्यात आली आहे. या प्रकरणी गेल्या  सहा महिन्यांपासून न.प. प्रशासन, जिल्हाधिकारी महोदय, मंत्रालयीन स्तरापर्यंत पर्यंत या गंभीर प्रकरणाची तक्रार करूनही संबंधित अवैध बांधकाम धारका विरोधात कुठलीही कारवाई न.प. प्रशासनाकडून करण्यात आली नाही. न.प. प्रशासनाला वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाईचे आदेश देवूनही न.प.तील अधिकारी, कर्मचारी हे त्या अवैध बांधकाम धारकास पाठीशी घालण्याचा प्रकार करीत आहेत.

शहरातील चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित शांती आरोग्यम् हॉस्पीलची बिल्डींगच्याअवैध बांधकामाबाबत तक्रारी झाल्यानंतर तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी बांधकाम धारकास २७.१२.२०२४ रोजी नोटीस देवून सदरचे बांधकाम काढण्याबाबत कळविले होते. अन्यथा सदरची बिल्डींग जमीनदोस्त करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याबाबत दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले होते. मात्र त्यानंतर मलकापूर न.प.मुख्याधिकारीपदी गजानन भोयर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देवून संबंधित बांधकाम धारकास कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली होती. मात्र संबंधित बांधकाम धारकांच्या वतीने कुठलीही कागदपत्रे न.प. प्रशासनाकडे सादर केली गेली नसल्याचे समजते. त्यामुळे मी वेळोवेळी न.प. प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी, निवेदने दिली. तसेच गोट्या खेलो आंदोलन, घागर पुजो आंदोलन, गाढव आंदोलन, अर्धनग्न आंदोलन तसेच तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी यांच्या गाडीला काळ्या फासणेचे आंदोलनही केले. तरीही सुस्त न.प. प्रशासनाला जाग आलीच नाही की जाग येवूनही त्या अवैध बांधकाम धारकासोबत अर्थपुर्ण साखर झोपेचे सोंग घेत असल्याची शंका उपस्थित होत आहे. 

तेव्हा या गंभीर व गेल्या कित्येक महिन्यांपासून न.प. प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असलेल्या प्रकरणी तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे अजय टप यांनी दिला आहे.

No comments