adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भावावर नियंत्रण पर्यावरणास हानी....NBS द्वारे इतर खतांसोबत युरिया आल्यास शेतकऱ्यांची हानी...चुकून शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यास उद्रेक होणार...एस बी नाना पाटील.

  भावावर नियंत्रण पर्यावरणास हानी....NBS द्वारे इतर खतांसोबत युरिया आल्यास शेतकऱ्यांची हानी...चुकून शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यास उद्रेक होण...

 भावावर नियंत्रण पर्यावरणास हानी....NBS द्वारे इतर खतांसोबत युरिया आल्यास शेतकऱ्यांची हानी...चुकून शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यास उद्रेक होणार...एस बी नाना पाटील.

.... _खत कंपन्यांनी नवा कांगावा करायला सुरुवात केली आहे."युरिया ने पर्यावरण हानी...मात्र जगभर बंदी असलेले कीटकनाशक/तणनाशक  व इतर रासायनिक खत यांचे मुळे पर्यावरणाची हानी होत नाही का? त्यांच्याच कृपेने हे  सुरू आहे.सारे शेतकऱ्यांना अगदी मुळापासून या देशातून उखडून फेकावे यासाठी हा कांगावा._ 

 २०१०मध्ये जेव्हा न्यूट्रियंट बेस्ड सिस्टम (Nutrient based system (NBS)) युरिया व्यतिरिक्त इतर खतांना लागू केली त्यावेळेस देखील संसदेत शेतकऱ्यांप्रती प्रेम उतू आले व जागतिक बाजारपेठेतील खतांच्या कमी किमतीचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा या साठी योजना लागू करणे कसे गरजेचे याचे फायदे सांगण्यात आले.प्रत्यक्षात गेल्या पंधरा वर्षात जगभर रासायनिक खतांची किंमत कमी होत होती भारतात मात्र  अनुदाने घेऊन देखील तिप्पट वाढत होती?का?का कमी झाले नाहीत खतांचे दर?यावर नियंत्रण कुणाचेही नाही. पाहिजे ते लुटा.

  ज्या कंपन्या युरिया चे वापराचा व पर्यावरण हानी चा आव आणत आहेत,त्या व त्यांच्या सहयोगी कंपन्यानी २०१५ पासून केंद्र सरकारच्या विविध समित्यांनी २७प्रकारचे कीटकनाशके भारतात वापरू नये म्हणून शिफारशी केल्यात त्यांना सुप्रीम कोर्टात आवाहन देऊन स्थगनादेश घेतला.

    _सरकार व कंपन्या यांना कोर्टाने विचारले वरील शास्त्रज्ञ चुकीचे होते का?आज देखील ते कोर्टात उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांच्या कृपेने कोट्यवधी जनता विष खावून मरणासन्न अवस्थेत जात आहे,भारतातील शेतीचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे.त्यावर ते बोलत नाहीत._ 

    युरिया NBS योजनेत आल्यास त्याचीही किंमत ₹२०००/-  ची गोणी करून शेतकऱ्यांना अगदी नागडा होई पर्यंत लुटता यावे  ह्यासाठी हा कंपन्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा....

  _भारतातील शेतकरी संघटित नसल्याने सरकार पद्धतशीर वातावरण तयार करून युरिया चे किमतीवरील नियंत्रण हटवून आहे ती शेवटची जबाबदारी तर झटकू इच्छित नाही ना?_ 

  शेतकरी विरोधी भारत सरकार(कोणतेही असले तरी )असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.

No comments