पत्र्याच्या शेड मधील रंगलेला तिरट जुगाराचा डाव विशेष पथकाने उधळला...खेळणारे 10 जण ताब्यात सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकव...
पत्र्याच्या शेड मधील रंगलेला तिरट जुगाराचा डाव विशेष पथकाने उधळला...खेळणारे 10 जण ताब्यात
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२६):-पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने एकूण ११ लाख ६१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन १० इसमां विरुध्द कारवाई केली आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार हे दि.२४ जुलै २०२५ रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथकासह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे आसिर छोटू पठाण हा माणिकदौंडी गावाच्या शिवारात शेतातील पत्र्याचे शेडमधील जागेत लोकांना एकत्र जमवून त्यांचे कडून पैसे घेवून त्यांना तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्याकरीता जागा उपलब्ध करुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळतो व खेळवितो.अशी बातमी मिळाल्याने तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकिगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह खाजगी वाहनाने रवाना झाले.बातमीतील नमुद वरील ठिकाणी माणिकदौंडी गावाचे शिवारात शेतातील पत्र्याचे शेडमध्ये विशेष पथकाने जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम मांडी घालून दोन गोलाकार डावांमध्ये बसलेले दिसले तसेच त्यांचे हातात पत्ते व समोर डावा मध्ये पैसे असल्याचे दिसून आले.पोलीस स्टाफची व पंचांची खात्री झाल्याने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी असलेले इसम पळून जाऊ लागले,त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले असता एकूण १० इसम मिळून आले.मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याचे ओळख सांगून त्यांना विश्वासात घेऊन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून /४६,५०० रुपये रोख रक्कम व ६५,०००/- रुपये किंमतीचे ०७ मोबाईल फोन तसेच १०,५०,०००/- रुपये किमतीचे लहान-मोठे ०६ वाहने असा एकूण १९,६१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.सदरचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करुन ताब्यात घेवुन मिळून आलेले १० आरोपींवर पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील पोसई.योगेश चाहेर, पोसई.राजेंद्र वाघ,पोहेकॉ.शंकर चौधरी,दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर,अजय साठे,सुनिल पवार,उमेश खेडकर,अरविंद भिंगारदिवे,दिनेश मोरे,सुनिल दिघे,अमोल कांबळे,संभाजी बोराडे,विजय ढाकणे,दिपक जाधव,जालिंदर दहिफळे यांनी केली आहे.
No comments