अमृत टप्पा 2 चे काम संथगतीने केदार सानप यांची तक्रार भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - भुसावळ शहरात अमृत टप्पा क्र. 1 चे काम...
अमृत टप्पा 2 चे काम संथगतीने केदार सानप यांची तक्रार
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- भुसावळ शहरात अमृत टप्पा क्र. 1 चे काम अपूर्ण असतांना गेल्या वर्षी दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी 136 कोटी 77 लाख रूपयांच्या अमृत टप्पा-2च्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. हे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी भुसावळ मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. याआधी ही अशी तक्रार भुसावळ प्रांताधिकारी यांच्याकडे केली असल्याचे श्री.सानप यांनी सांगितले.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमृत टप्पा 2 चे 136 कोटी 77 लाख रूपयांच्या कामाचे 15 ऑक्टोबर 2024 रोजी भुमीपूजन करण्यात आले. मात्र आजरोजी 9 महिने झालेले असतांनाही संबंधित ठेकेदार याने हेडवर्कचे कामासह अशुध्द पाण्याचे उर्ध्ववाहिनेचे काम, प्रीसेटींग टँक आणि जलशुध्दीकरण केंद्राचे काम तसेच शुध्द उर्ध्ववाहिनी त्याचप्रमाणे उंच जलकुंभ क्र. 8 चे कामासह वितरण व्यवस्थेचे काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. या संदर्भात संबंधित ठेकेदारावर योग्य ती कायदेशिर कारवाई करावी व हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी भुसावळ मुख्याधिकारी यांच्याकडे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

No comments