हिंगोणे येथे भारतीय बौध्द महासभाच्या वतीने वर्षावास पुष्प-4थे कार्यक्रम संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हिंगोणे त...
हिंगोणे येथे भारतीय बौध्द महासभाच्या वतीने वर्षावास पुष्प-4थे कार्यक्रम संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हिंगोणे ता.चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुका यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तिमाई वर्षवास कार्यक्रम निमित्ताने वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत 27 जुलै 2025 रविवार रोजी पुष्प 4थे चे उद्घाटन तुकाराम नारायण बाविस्कर माजी सभापती पंचायत समिती चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा तालुका माजी अध्यक्ष सुदाम रामदास करंकाळ यांनी केले.वर्षावास कार्यक्रम सुरवातीस त्रिशण,पंचशील,बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्मृती वंदना म्हणून करण्यात आली.आलेले सर्व मान्यवर कार्यकारणी पदाधिकारी यांचे स्वागत हिंगोणे येथील बौद्ध उपासक यांनी केले.
आजच्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या विषय होता महाबोधी विहार व बौध्दांची पवित्र स्थळे या विषयावर प्रवचनकार भरत भिमराव शिरसाठ,शहर अध्यक्ष तथा बौद्धचार्य यांनी धम्म देसना दिली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सुदाम रामदास करंकाळ बौद्धचार्य,बापूराव वाणे,शालिकग्राम करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात तुकाराम बाविस्कर यांनी बौद्ध धम्मविषयी आपल्या मुलांना संस्कार माता उपासिकानी दिले पाहिजेत असे मनोगतात व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमेश गोबा सोनवणे (कोषाध्यक्ष )यांनी केले.
सदर कार्यक्रमास तालुकाध्यक्ष बापूराव वाणे,शहराध्यक्ष भरत शिरसाठ,तुकाराम नारायण बाविस्कर, सुदाम करंकाळ,शालिग्राम करंदीकर ज्येष्ठ मार्गदर्शक जानकीराम सपकाळे व वसंत शिंदे, तसेच भिका बाविस्कर,(माजी सरपंच हिंगोणे)आधार बाविस्कर, बाळू बाविस्कर, मधुकर बाविस्कर, सुनिल बाविस्कर, बंटी बाविस्कर आदी समस्त बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने वर्षावास कार्यक्रमास उपस्थित होते.



No comments