शिवथर येथील पूजा जाधव चा खून प्रेम संबंधातूनच, सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या 8 तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला..!! सौ. कलावती गवळी ( सा...
शिवथर येथील पूजा जाधव चा खून प्रेम संबंधातूनच, सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या 8 तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला..!!
सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात अनैतिक संबंधातून पूजा प्रथमेश जाधव ( वय 30) या विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना शिवथर गावात सोमवारी दुपारी चारच्या सुमारांस घडली हा खून कोणी व कोणत्या कारणांतून केला हे प्रथमता स्पष्ट झाले नव्हते मात्र सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत पूजा प्रथमेश जाधव हिचा खून गावातीलच प्रियकर अक्षय रामचंद्र साबळे (वय 28 ) यांने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पूजा प्रथमेश जाधव हिचा दहा वर्षांपूर्वी शिवथर गावातीलच प्रथमेश जाधव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. विवाहित पूजा आणि अक्षय साबळे या दोघांचे अनैतिक संबंध होते. यातूनच अक्षय साबळे याने पूजाकडे लग्नाची मागणी केली होती. मात्र पूजा ही विवाहित व तिला सात वर्षाचा मुलगा असल्यामुळे तिने त्यास नकार दिला होता. याचाच राग मनात धरून सोमवारी दुपारी पूजा ही घरात एकटी असल्याचे पाहून अक्षय रामचंद्र साबळे यांनी धारदार शस्त्रांने तिच्या गळ्यावर सपासप वार करून प्रियकर अक्षय साबळे यांनी पुण्याला धूम ठोकली होती. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली.
तपासाची चक्रे गतिमान करीत अखेर सातारा तालुका पोलिसांनी प्रियकराला पुण्यातून अवघ्या 8 तासांत अटक केली आहे. या विवाहितेचा खून गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे (वय 28 ) याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा तालुका पोलिसांनी त्याला रात्री मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बस स्थानकांच्या परिसरांतून ताब्यात घेवून प्रथमता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी प्रियकराने खुनाची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे पोलीस उपनिरीक्षक विनोद नेवसे स.पो.नि. अनिल मोरडे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे पो.हवा. दादा स्वामी पो.हवा. संदीप आवळे पो.हवा. राहुल राऊत पो.हवा. सचिन पिसाळ सातारा तालुका पोलीस ठाणेतील आदीं पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यांत सहभाग घेतला. सातारा तालुका पोलिसांच्या कामगिरीबद्दल शिवथर परिसरांतून तसेच पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे .
No comments