चंद्रकांत शांताराम बडगुजर यांनी दुसऱ्यांदा इंग्रजी विषयातून 91 percentile मिळवून घवघवीत यश केले संपादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
चंद्रकांत शांताराम बडगुजर यांनी दुसऱ्यांदा इंग्रजी विषयातून 91 percentile मिळवून घवघवीत यश केले संपादन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्राध्यापक (प्रोफेसर) पदाची पात्रता ठरविणारी UGC NET परीक्षा २७ जून २०२५ रोजी झाली आणि त्या परीक्षेचा निकाल २१ जुलै २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत चंद्रकांत शांताराम बडगुजर यांनी दुसऱ्यांदा इंग्रजी विषयातून 91 percentile मिळवून घवघवीत यश संपादन केले. चंद्रकांत बडगुजर यांचे शालेय शिक्षण महिला मंडळ माध्यमिक विद्यालय शाळेत झाले आहे तर उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी महात्मा गांधी संचालित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे घेतले आहे. तसेच यांनी B.Ed ची पदवी चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा या ठिकाणी घेतले आहे. अतिशय हालाखीची परिस्थिती, अपुरेसे शैक्षणिक साहित्य आणि संदर्भ ग्रंथाचा अभाव असताना देखील त्यांनी दुसऱ्यांदा UGC NET या परीक्षेत यश मिळवले. ह्या परीक्षेची काठिण्य पातळी अवघड असल्याने हैदराबाद, दिल्ली अश्या ठिकाणी कोचिंग क्लासेस लावावे लागतात मात्र चंद्रकांत सरांनी घरीच स्वंयम अध्ययनातुन हे भले मोठे यश संपादन केल्याने सर्व सामाजिक स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.

No comments