विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘विठ्ठलनामाची शाळा’ उत्साहात साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विठुराया आणि आषाढ...
विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘विठ्ठलनामाची शाळा’ उत्साहात साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विठुराया आणि आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शाळेच्या परिसरात साक्षात पंढरपूरचे दर्शन घडले.
विठ्ठल-रखूमाई आणि वारकरी यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी व “माउली माउली” च्या जयघोषाने वातावरण भक्तिरसाने भारून गेले. विठ्ठल-रखूमाईची विधिवत पूजा करण्यात आली. इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांनी संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करत रसिकांची मने जिंकली. इ. ५ वी व ७ वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
संगीत शिक्षक विवेक बाविस्कर यांनी गायलेल्या भक्तिरसपूर्ण भजनांवर सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे ठेका धरला. अंजली जोशी मॅडम यांनी वारी व दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास काका हरताळकर, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आशा चित्ते मॅडम, तसेच इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा मिस्त्री मॅडम आणि शिक्षकवृंद यांची उपस्थिती लाभली.

No comments