आदिवासींच्या १२ हजार ५०० पदांची रखडलेली विशेष पदभरती युद्धपातळीवर सुरु करा - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदिवासी तडवी भिल्ल युवा कृ...
आदिवासींच्या १२ हजार ५०० पदांची रखडलेली विशेष पदभरती युद्धपातळीवर सुरु करा -
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समिती यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी :
विविध मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास मंत्रालयावर उलगुलान मोर्चाचा दिला इशारा व ९ आगस्ट आदिवासी दिनानिमित्त शासकीय सुट्टी मिळाली ही निवेदनाद्वारे मागणी
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव - राज्यभरातील आदिवासी समाजात शिक्षणाची जागरूकता वाढल्याने बेरोजगार उच्चशिक्षित युवक युवतींची संख्या गंभीरपणे वाढत आहे.मात्र मोठ्या प्रमाणात शिक्षित होऊनही गेल्या काही वर्षात कुठलीही शासकीय भरती प्रक्रिया राबवली गेली नाही. परिणामी बेरोजगार आदिवासी युवक युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष धुमसत आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पूर्वलक्षी प्रभावाने १२ हजार ५०० पदांची रखडलेली विशेष पदभरती युद्धपातळीवर सुरु करावी अशी आग्रही मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समिती यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत देण्यात आले.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ ला बोगस आदिवासींनी खऱ्या मूळनिवासी आदिवासींच्या बळकावलेल्या जागा तात्काळ रिकाम्या करण्याचा निकाल पारित केलेला आहे.त्यानुसार बोगस आदिवासींच्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींना सामावून घेण्यासाठी युद्ध पातळीवर पदांची भरती करण्यासाठी न्यायालयीन निकालाची तातडीने अंमलबजावणी करावी.नाशिक येथे वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी वाल्यांचे बिऱ्हाड आंदोलन सुरू असून त्या रोजंदारी वर्ग ३ व ४ वाल्यांना तात्काळ रोजंदारी आदेश देण्यात यावे.पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावरील नियुक्ती आदेश कायमस्वरूपी करण्यात यावे आदी मागण्या प्रभावीपणे निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनानुसार नमूद सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन आदिवासी जनतेला न्याय मिळावा.अन्यथा लाखो आदिवासी बेरोजगार युवक युवतींचा मंत्रालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला व ९ ऑगस्ट आदिवासी दिवस हा आदिवासीचा अस्मितेचा व गौरवाचा दिवस असल्यामुळे जागतिक आदिवासी दिवस असल्यामुळे शासकीय सुट्टी जाहीर करावी हि मागणी करण्यात आली.त्याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र महानिरीक्षक रौनक तडवी,युवा जळगाव जिल्हाध्यक्ष मुराद तडवी आदिवासी युवा कृती समिती सदस्य बिस्मिल्ला तडवी,बबलू तडवी अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद नवनियुक्त जळगाव जिल्हाध्यक्ष अल्ताफ तडवी,शकिल तडवी,मजित तडवी,रियाज तडवी,समीर तडवी,अरबाज तडवी,जुनेद तडवी,सलीम तडवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते
No comments