adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री राघवेंद्र स्वामी मंदिरात चोरी करणा-या टोळीच्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 श्री राघवेंद्र स्वामी मंदिरात चोरी करणा-या टोळीच्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अ...

 श्री राघवेंद्र स्वामी मंदिरात चोरी करणा-या टोळीच्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.४):-बोल्हेगाव येथील राघवेंद्र स्वामी मंदिरा बाहेर असणारी दानपेटी अज्ञात चोरटयांनी फोडुन त्यातील ६०००/-रुपये रोख रक्कम चोरुन नेली होती.या घटने संदर्भाने सचिन धोंडीभाऊ सिनारे (वय ३२ वर्ष रा.श्री.राघवेंद्र स्वामी मंदिर बोल्हेगाव ता.जि.अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा.रजि.नंबर ६९९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ड) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांचे सुचने प्रमाणे सदर गुन्हयाचे तपासकामी एक स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. तपास पथकाने सतत गुन्हयाचे घटना अनुषंगाने गुन्हा करणारे चोरटयां बाबत माहिती घेत असतांना सदरचा गुन्हा हा शारुन डाके रा.गांधीनगर बोल्हेगाव ता. जि.अहिल्यानगर व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार अशांनी केला असल्याची माहिती मिळाल्याने शारुन डाके याचा शोध घेतला असता तो घटनेपासुन पसार झाला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याचे साथीदारांचा शोध घेतला असता त्याचे दोन अल्पवयीन साथीदार मिळुन आल्याने त्यांना पालकां समक्ष ताब्यात घेवुन तपास करण्यात आला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन मौज मजा करण्यासाठी पैसे मिळावे म्हणून गुन्हा केला असल्याची माहिती दिली आहे.गुन्हयाचा पुढील तपास सफौ/गोपीनाथ गोरडे हे करत आहेत.सदरची उल्लेखनिय कामगीरी ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उप विभागीय पोलीस अधिकारी न.श.विअ.नगर श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांचे सुचनेप्रमाणे,पोसई/परशुराम दळवी,सफौ/गोपीनाथ गोरडे,पोहेकॉ योगेश चव्हाण, अब्दुल ईनामदार,सुधीर खाडे, पोका/सुमित गवळी,बाळासाहेब भापसे,सुजय हिवाळे,सतिष भवर,भागवत बांगर,अविनाश बर्डे,रोहकले यांनी केली आहे

No comments