लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ )श्री राहुल कुमार मीना यांची हेर गावास भेट... लातूर जि. प्र.(उत्तम माने) (संपादक -:- ह...
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ )श्री राहुल कुमार मीना यांची हेर गावास भेट...
लातूर जि. प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.२५/०/२५, उदगीर तालुक्यातील हेर गावामध्ये दुपारी 4:30 च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या सीईओ नी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये भेट दिली. भेटीवेळी शाळेच्या वर्ग खोल्या, शौचालयाची अवस्था, पंखे, वीजपुरवठा याची पाहणी केली. प्रत्येक वर्ग खोलीत जाऊन सीईओनी स्वतः विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली. तसेच शिक्षकांनाही विचारपूस करून विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शाळेच्या वातावरणाबाबत विचारणा केली व हेर ग्रामपंचायत नि राहिलेल्या सुविधांची पूर्तता करावी अशी आज्ञा सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच आदिंना केली. जिल्हा परिषदेच्या मैदानात वृक्षारोपण ही त्यांनी केले.. त्यानंतर सीईओ श्री राहुल कुमार मीना साहेबांनी प्राथमिक आरोग्य केंद्र हेर येथे भेट दिली... आरोग्य केंद्रातील स्टाफ सोबत चर्चा केली. ऑपरेशन थिएटर, ओपीडी, स्वच्छता, हजेरी पुस्तक, औषधी भंडार यांची पाहणी केली.. साहेबांनी हेर आरोग्य केंद्रामध्ये दिवसभरासाठी डॉक्टर मिळावेत यासाठी ही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली... यावेळी पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, सरपंच सारिका सूर्यवंशी, उपसरपंच तुळशीराम बेंबडे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन भोसले, व बी एस मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते............

No comments