जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय व विविध स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेत सुयश इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमका...
जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शासकीय व विविध स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेत सुयश
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे योगदान असते. स्पर्धात्मक परीक्षांचा उद्देश विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळवून देणे असतो. या परीक्षेत उत्तीर्ण होणं प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असतं. अनेक महिन्यांच्या अभ्यासानंतर मिळालेले यश साजरे करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे. टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येते. सोबतच यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मेहनतीचं कौतुक केले जाते; ज्यातून अनेक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी नवीन प्रेरणा मिळते. त्यापैकीच एक म्हणजे शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षा व मंथन स्पर्धा परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन करत जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल द्वारे मुलांना प्रोत्साहित करून अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी करून घेतले जाते आणि मुले सुद्धा आपले कौशल्य दाखवत शाळेचे नाव उंचावतात.
अशाच काही विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर सुजान राजू तडवी हि १ ली तर स्वरीत संदीप पाटील १ ला, ऋषिकेश मिलिंद झोपे २ रा, स्वरित सचिन कपले ३ रा, धनश्री सतीश वाघमारे ४थी, तर भाग्यलक्ष्मी तुषार भंगाळे ६ वी यांनी सामान्य ग्रामीण भागातून प्राविण्य मिळवले,तर सामान्य ग्रामीण स्तरामधून श्रेयस राजेंद्र कोंडे १४१ वा, रुचिका प्रकाश बोरोले हिने २०३ रा, वेदांत रवींद्र कोल्हे २३२ वा, मयुरी अनिल साळुंखे ही २३३ वी,तर अंकिता सहदेव काळे हिने २३४ वा क्रमांक प्राप्त केला.यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत फक्त यश प्राप्त केले नाही; तर गुणवत्ता यादीतही स्थान प्राप्त केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या विविध विषयांवरील ज्ञान आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलंपियाड परीक्षेत इयत्ता इयत्ता तिसरीतील सिद्धेश तुषार धांडे, विहान चंदन पाटील इयत्ता चौथी, तर नेहल निलेश पाटील इयत्ता सहावी यांनी ऑलंपियाड स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या स्तरावर यश प्राप्त करत, दुसऱ्या स्तरावर प्रवेश मिळवून त्यातही घवघवीत यश प्राप्त केले.
तर मंथन परीक्षेत इयत्ता पहिलीच्या तनय गणेश चौधरी यांने केंद्रातून पहिला क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरावर २५ वा तर राज्यातून ३३ वा क्रमांक प्राप्त केला, इयत्ता दुसरीतील धवल जितेंद्र पाटील यांनी केंद्रातून २ रा तर जिल्ह्यातून २३ वा व राज्यातून २८ वा क्रमांक प्राप्त केला, मोनल हेमंत फालक हिने केंद्रातून २ रा तर जिल्ह्यातून २७ वा आणि राज्यस्तरावर ३२वा क्रमांक प्राप्त केला, तसेच इयत्ता सहावीच्या नेहल निलेश पाटील याने केंद्रातून १ला, जिल्हास्तरावर २७ वा व राज्यस्तरावर ६० वा क्रमांक प्राप्त केला व देवश्री धनराज भंगाळे हिने केंद्रातून २ रा, जिल्ह्यातून ३४ व राज्यस्तरावर ६८ वा क्रमांक प्राप्त केला. शाळेचे नाव उंचावले. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. यासोबतच शाळेतील इयत्ता तिसरीच्या बुद्धेश योगेश तायडे या विद्यार्थ्याने जिल्हयात पाचवा क्रमांक प्राप्त करून १३२ गुण मिळवत जिल्हास्तरावर सन्मान प्राप्त केला.
कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे प्राचार्य मोझेस जाधव यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांना नेहमी प्रश्न विचारणे व शिक्षकाने ही कधीच अनुत्तरीत न राहता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना द्यावे असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा वेळी पर्यवेक्षिका पुनम नेहेते, शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच समस्त विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जावळे यांनी केले.
No comments