शहिद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम सोसायटी तर्फे मोफत वहया वाटप शहिद अब्दुल हमीद यांचं बलिदान आपल्याला कर्तव्यात प्रामाणिक आणि ...
शहिद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम सोसायटी तर्फे मोफत वहया वाटप
शहिद अब्दुल हमीद यांचं बलिदान आपल्याला कर्तव्यात प्रामाणिक आणि देशासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा देते - हाजी आलम खान
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शहीद अब्दुल हमीद यांचं जीवन आपल्याला शिकवते की, देशप्रेम ही फक्त भावना नाही ती कृती आहे.आज आपण जरी शस्त्र हातात घेत नाही, पण आपलं शस्त्र म्हणजे शिक्षण, प्रामाणिकपणा, आणि कर्तव्यभावना आहे. अब्दुल हमीद यांचं बलिदान हेच आपल्याला प्रेरणा देतं की आपणही आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहावं आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक योगदान द्यावं. शहीद अब्दुल हमीद यांना त्यांच्या शौर्याबद्दल भारताच्या सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हे भारतातील सर्वात प्रतिष्ठेचे वीरता पदक आहे. हे पदक मिळवणारे ते पहिले मुस्लिम जवान होते.त्यांचे नाव आजही भारतीय लष्करात, आणि प्रत्येक देशभक्ताच्या मनात,अत्यंत सन्मानाने घेतले जाते असे प्रतिपादन शफी हज उमरा टुर्सचे संस्थापक हाजी आलम खान यांनी केले.
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनच्यावतीने स्वतंत्रता सेनानी शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातील जिल्हा परिषद शाळा फकीरवाडा येथे मोफत वहया वाटप मरहुमा हज्जन शमीम सैफअली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शफी हज उमरा टुर्स चे संस्थापक हाजी आलम खान, मुस्कान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, अलनुर आय केयर सेंटर चे तनवीर चष्मावाला, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, शेख दिलशाद मुसा, पठाण सुमय्या मोहसीन, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बुशरा बाजी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आलम खान म्हणाले की वह्यावाटप केवळ शिक्षणसाहित्याचे वाटप नाही तर हा एक संदेश आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक जबाबदारीचा, या लहानशा कृतीतून आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकण्याची प्रेरणा देत आहोत. शिकणे हीच खरी शक्ती आहे, तुम्ही शिकाल, घडाल आणि समाजाचे उज्वल भविष्य घडवाल अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार तनवीर चष्मावाला यांनी मानले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments