जिवासेनेच्या रावेर तालुका अध्यक्षपदी सुरेंद्र शिरनामे यांची निवड. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अखिल भारतीय जी...
जिवासेनेच्या रावेर तालुका अध्यक्षपदी सुरेंद्र शिरनामे यांची निवड.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अखिल भारतीय जीवा सेना रावेर तालुक्याची बैठक मोठा वाघोदा बु येथे संपन्न झाली या बैठकीत 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहावी बारावी गुणगौरव सोहळा तसेच मानाचा नाभिक हिरकणी पुरस्कार व शिवरत्न वीर जिवाजी महाले पुरस्कार या कार्यक्रमांचे आयोजनासाठी चर्चा करण्यात आली पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुरेश भाऊ ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय जीवा सेना जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सेठी होते यावेळी अखिल भारतीय जीवा सेना रावेर तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणी मध्ये अखिल भारतीय जिवा सेनेच्या रावेर तालुकाध्यक्षपदी मोठा वाघोदा बु येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिरनामे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिव पदी राजेश सावळे कार्याध्यक्षपदी योगेश भास्कर अमोदकर उपाध्यक्ष पदी गोकुळ साळुंखे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी अखिल भारतीय जीवा सेना जिल्हा संघटक योगेश बोरनारे, धनराज बोरणारे सर, हेमंत चांदवे, राजेश बोरनारे, किशोर बोरनारे, महेंद्र सापकर, अनिल मानकरी, विश्वास कुवर, उमेश निंबाळकर, महेंद्र बोरनारे, काशिनाथ आटवाडेकर, नामदेव निंबाळकर, चिंतामण आमोदे, शांताराम निंबाळकर, प्रभाकर मानकरे, दिनेश जैनकार, किरण बोरसे, पुंजाजी तांदूळकर, राज निंबाळकर, चेतन जैनकार, यांच्यासह तालुक्यातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन धनराज बोरनारे सर तर आभार उमेश निंबाळकर यांनी मानले.
No comments