adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"शेती वाचवायची आहे ? मग 'मित्र' शोधा, 'विष' नव्हे !"

 "शेती वाचवायची आहे ? मग 'मित्र' शोधा, 'विष' नव्हे !"   लेख . (शब्बीर खान ) यावल            " अरे हो पिकं तर...

 "शेती वाचवायची आहे ? मग 'मित्र' शोधा, 'विष' नव्हे !" 


 लेख . (शब्बीर खान ) यावल

           " अरे हो पिकं तर सुरळीत दिसत आहे, होते... मग एवढी नासधूस कशी झाली अचानक?" ते बघ मुळे पोखरलीत, ही कीड गेल्या काही वर्षात फारच वाढली आहे."

             असं संभाषण शेतावर ऐकायला येणं काही नवीन नाही. सतत वाढणाऱ्या कीटकांच्या त्रामामुळे शेतकर्यांचं डोकं सैरभैर झाले आहे.रासायनिक कीटकनाशके वापरुन झालेला परिणाम ? कीटक काही केल्या थांबल नाहीत... आणि मातीचं आरोग्यही ढासळतंय !

मग पर्याय काय ?

उत्तर आहे - एन्टोमोपैथोजेनिक नेमाटोड्स (Entomopathagenic Nematode). हो हो नाव थोडं जड वाटेल, पण हे जीव अगदी हलक्या पावलांनी तुमचे पीक वाचवायला सज्ज आहेत .

एंटोमोपैथोजेनिक नेमाटोड्स म्हणजे काय ? 

'ऍटोमोपॅथोजेनिक नेमाटोड्स' हे कीटकांना संक्रमित करणारे आणि त्यांना मारणारे  सूक्ष्मजंतू आहेत. ते जमिनीमध्ये आणि विविध प्रकारच्या कीटकांवर (जसे की अळ्या, भुंगेरे, पतंग आणि फुलपाखर) परजीवी म्हणून राहतात. कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नैसर्गिक व प्रभावी उपाय आहे, कारण ते मानवासाठी हानिकारक नाहीत.

कोणत्या कीटकांवर उपयोगी

१ शेंगा पोखरणारी  अळी

२ पांढरी माशी

३ ऊस भुईखोचक कीटक

४भात वाळवी 

EPNs (एंटोमोपैथोजेनिक  नेमाटोड्स) चे प्रकार.

१) स्टोनरनेमा (steinernema)

२) हेटेरोहैब्डिटिस (Heterorhabditis)



१) स्टोनरनेमा (steinernema)

   १) हे नेमाटोइस शरीरात 'फोटोरहेड्स' नावाचे                     जीवाणू  घेऊन फिरतात.

   २) उदाहरण-

     १)स्टायनरनेमा कार्पोकैप्सी (Steinenema  

           carpocapsac)

     २)स्टायनरनेमा ग्लैसरी  (Steinenema    

          glaseri)


२) हेटेरोहैब्डिटिस (Heterorhabditis)

   १) 'सेनोहँडस' नावाचे जीवाणू घेऊन फिरतात.

   २) उदाहरण-

      १)हेटेरोहैब्डिटिस बॅक्टेरिओफोरा 

         (Heterorhabditis bacteriophora)

      २)हेटेरोहैब्डिटिस इंडिका (Heterorhabditis  

           indica)


पुनरुत्पादन / संसर्गाची प्रक्रिया :-

१) EPNs कीटकांच्या नैसर्गिक छिद्रांद्वारे  

  (Natural opening) किंवा त्वचेतून शरीराव प्रवेश  

  करतात.

२) नंतर ते कीटकांच्या आत प्रवेश करून त्यांच्या-सोबत 

   असलेल्या बॅक्टेरियाला (symbiotic bacteria) 

   सोडतात.

३) हे बॅक्टेरिया कीटकांमध्ये विषबाधा (toxins) निर्माण 

   करतात, ज्यामुळे कीटक मरतात.

४) EPNS कीटकांचे अवशेष खातात आणि पुनरुत्पादन करून त्यांची संख्या वाढवतात.

ENPS चा वापर :-

१)भाजीपाला :- टोमॅटो, बटाटा,वांगे, कांदा.

२)फळे :- सफरचंद ,केळी, लिंबूवर्गीय फळे.

३)शेतीतील पिके :-कापूस, मका, ऊस.

४)मसाल, औषधी वनस्पती व सौंदर्य-वर्धक झाड .

ENPs चे फायदे :-

१) नैसर्गिकरित्या उपलब्ध :- ENPs हे नैसर्गिकरित्या मातीमध्ये आढळतात.

२)रसायनिक कीटकनाशकांचा पर्याय:- ENPs रासायनिक कीटकनाशकांचा एक सुरक्षित व प्रभावी पर्याय आहे. ते पर्यावरणावर कमी परिणाम करतात.

३)प्रभावी व सुरक्षित: ENPs मातीमध्ये टीकून राहू    

  शकतात. मानवासाठी सुरक्षित आहेत. 

४) दीर्घकाल टिकणारे :- ENPs मातीमध्ये खूप वेळ 

  टिकून राहतात. त्यामुळे त्यांचा परिणाम पुढील 

  पिकातील कीटकांवर होऊन त्यांचे नियंत्रण होण्यास 

  मदत होते.

५) वापरण्यास सोपे :- ENPs चा  वापर करणे खूप सोपे आहे व ते पिकांवर फवारणीद्वारे किंवा मातीमध्ये मिसळून वापरले जाऊ शकते.

६) खर्चासगि प्रभाषी:- ENPs चा वापर रासायनिक  

  कीटकनाशकांच्या तुलनेत अधिक खर्च  प्रभावी असू 

   शकतात.

७) पर्यावरणास पुरक :-  ENPs वापरामुळे पर्यावरणाला 

  कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही . रासायनिक 

  खतांचा कीटकनाशकांचा वापर कमी होतो.

८) प्रदूषण कमी होते: रासायनिक कीटकनाशकाच्या 

   वापरामुळे जे मृदाप्रदूषण होते, ते                     

    एंटोमोपैथोजेनिक  नेमाटरोड्‌स च्या वापरा मुळे 

   आटोक्यात येते.

एंटोमोपॅथोजेनिक नेमाटोइस कसे वापरावे :-

१)नेमाटोड्स खरेदी करा :-

  ENPs ऑनलाईन किंवा कृषिआधारीत  दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. विशिष्ट कीटकांवर नियंत्रण   मिळवण्यासाठी योग्य असलेल्या नेमाटोड्सची निवड करा.

२) नेमाटोड्सची मात्रा :-

  पॅकेजवरील सूचनांचे पाचन करा. सामान्यता :- 100 ग्रॅम पॅकेट 1/10 एकर जमिनीसाठी पुरेसे असते.

३)द्रावण बनवणे :-

  नेमाटोड्सला पाण्यात मिसळा . सूचनांनुसार1.5 L  

  पाण्याच्या कॅनमध्ये मिसळून झाडांच्या आजूबाजूला 

  आता  द्रावण फवारताना,  पाण्याच्या बाटलीत किंवा 

   स्प्रेअरमध्ये मिसळून घ्या.

४) वापर :

  द्रावण झाडांच्या मुळाजवळ किंवा कीटकांचा प्रादुर्भाव  

  असलेल्या  ठिकाणी ओता. ओल्या जमिनीत   

  नेमाटोड्स चांगले काम करतात, म्हणून  माती ओलसर 

  ठेवा. योग्य तापमानावर आणि वातावरणात ENPs  

  चांगले कार्य करतात.

५)नेमाटोड्‌सचे निरिक्षण :-

  नेमाटोड्सचा वापर केल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत

  त्यांच्या कार्याचे निरिक्षण करा. गरज वाटल्यास   

  पुन्हा नेमाटोइसचा वापर करा.

भविष्यातिल दिशा

    "जैविक कीटक नियंत्रणाची शाश्वत साधने-एन्टोमोपैथोजेनिक नेमाटोड्स ."

      सध्याच्या रासायनिक कीटकना‌शकांच्या अति वापरामु‌ळे जमिनीतली सुपीकता, पर्यावरणाचे संतुलन आणि मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. अशा वेळी जैविक कीटकनाशकांचा वापर हा काळाची गरज बनत आहे. ENPs  हे असेच एक नैसर्गिक कीटकनाशक आहे, जे मातीतील कीटक नष्ट करण्यासाठी वापरले जाते .हे नेमाटोड्स आपल्याबरोबर विशिष्ट जीवाणू बाळगतात, कीटकांच्या शरीरात प्रवेश करुन  त्याचा नाश करतात. सर्वांत महत्वाचं म्हणजे हे नेमाटोड्स, विशिष्ट कीटकांवर परिणाम करतात .त्यामुळे ते पर्यावरणपूरक आहेत. भारतामध्ये आता अनेक राज्यांमध्ये याचा वापर वाढू लागला असून शेतकरी यांच्याकडे सकारात्मकपणे पाहू लागले आहेत.


वैशिष्ट्ये :-

 फक्त कीटकांवर परिणाम.

माणसांवर, प्राण्यांवर किंवा पिकांवर दुष्परिणाम नाही.

मातीच्या आरोग्यासाठी हितकारक.

सेंद्रिय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपयुक्त.

भविष्यातील दिशानिर्देश :-

१) सुधारित सूत्र :- संशोधनाचे उद्दीष्ट ENPs ची 

   स्थिरता आणि प्रभावीता पाठवणे आहे.

२) जनुकिय बदल :- शास्त्रज्ञ ENPs  ची                         कार्यक्षमता वाढवण्यासाठी जनुकीय बदल   

   (Genetic Modification) करत आहेत.

३) एकीकृत कीड व्यवस्थापन (IPM) :- कीड      

   नियंत्रणासाठी EPNs  चा उपयोग  केला जात 

   आहे.

शेतकऱ्याची यशोगाथा :

शेतकरी -  रामभाऊ पाटील

गाव - लोणी खुर्द, जि. सोलापूर

पीक -  मका (2 एकर‌ क्षेत्र)

समस्या-  फॉल आर्मीवर्म ची मोठ्या प्रमाणात लागण-

       रामभाऊ पाटील हे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत. २०२३  मध्ये त्यांच्या मका पिकावर फॉल आर्मीवर्म नावाच्या फीटकांचा मोठा प्रादुर्भाव आला.त्यांनी कीटकासाठी‌ मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. 

उपाय :-  तेव्हा कृषी विभागाच्या शिफारशीनुसार त्यांनी Steinernema carpocapsae हे कीटक नाशक सूत्रकृमी वापरण्याचा  निर्णय घेतला.

परिणाम:-

४०-७५% कीटक नियंत्रण साध्य झाले.

पिकांचे उत्पादन वाचवले गेले . पिकांचे आर्थिक नुकसान टळले. जैविक सेंद्रिय शेतीच्या तत्वांना धोका न आणता कीटक नियंत्रण शक्य झाले. शेजारील शेतकऱ्यांनीही ही पद्धत स्विकारली.

निष्कर्ष:-

                   एंटोमोपॅयोजेनिक नेमाटोड्स कीटक नियंत्रणासाठी एक  आशादायक जैविक उपाय आहेत .

जे रासायनिक कीटकनाशकांना , नैसर्गिक पर्यावरणास अनुकूल पर्याय प्रदान करतात .चालू संशोधन आणि विकासासह ENPs मध्ये IPM धोरणामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची क्षमता आहे, त्यामुळे पर्यावरणीय प्रदूषणाचा धोका कमी होतो आणि शाश्वत शेती पद्‌धतीला प्रोत्साहन मिळते.

लेखिका - मधुरा पवार व प्रगती चव्हाण.

No comments