adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु रंधा फॉल सुरु,पर्यटकांना पर्वणी

  भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु रंधा फॉल सुरु,पर्यटकांना पर्वणी  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) उत्तर अहिल्यानगर जिल्ह्...

 भंडारदरा धरणातून विसर्ग सुरु रंधा फॉल सुरु,पर्यटकांना पर्वणी 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून आज   रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७४४१ दलघफू (६७.४१ %) झाल्याने रंधा फॉल सुरु झाला असुन पर्यटकांना पर्वणी सुरु झाली आहे.

      भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे. जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणेकरीता  भंडारदरा धरणातुन विदयुतगृह मधून ८४५ क्युसेक्स तर स्पील वे गेट मधून १०५८ क्युसेस ने पाणी सोडण्यात आले असून एकूण १९०३ क्युसेस पाणी धरणातून विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी जास्त होऊ शकतो. १५ जुलैपर्यंत ६५ % लेव्हल कायम ठेवण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले.

         मागील दोन दिवस या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले होते. पंधरा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडीप देणार असे वाटत असतानाच आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी जास्त होत असून गत २४ तासात भंडारदरा ३० येथे  मिमी, घाटघर ७४ मिमी, तर रतनवाडी येथे ६६ मिमी, पांजरे येथे ५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

     धरणातून पाणी सोडल्याने रंधा धबधबा प्रथमच वाहता झाला असल्यामुळे पर्यटकांना आनंद होत आहे. तसेच भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होत असून सध्या निळवंडे धरणातून शेती आवर्तनासाठी ९०० क्युसेस ने विसर्ग चालू आहे. त्यामुळे प्रवरा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढते आहे. आढळा नदीवरील देवठाण धरण भरले असून आढळा नदी पात्रात पण पाण्याची पातळी वाढली असून हे पाणी प्रवरा नदीला मिळणार आहे.

        मुळा परिसरात पावसाचे तांडव वाढल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. मुळा धरणात चांगला पाणी साठा होत आहे. मात्र आदिवासी भागात भात खाचरे भरले असल्याने रोपे पाण्याखाली गेल्याने अवनीस उशीर होत आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटले आहे.  यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. रोपे जर गेली तर भात लागवड होणार कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.- 


वृत्त विशेष सहयोग

पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे - अकोले

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments