adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगरात शिवसेनेची नवी दमदार टीम सज्ज! संतोष मराठे ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख’, निलेश मेढे ‘तालुका प्रसिद्धी प्रमुख’ पदावर नियुक्त!

  मुक्ताईनगरात शिवसेनेची नवी दमदार टीम सज्ज!  संतोष मराठे ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख’, निलेश मेढे ‘तालुका प्रसिद्धी प्रमुख’ पदावर नियुक्त! मुक...

 मुक्ताईनगरात शिवसेनेची नवी दमदार टीम सज्ज!

 संतोष मराठे ‘जिल्हा प्रसिद्धी प्रमुख’, निलेश मेढे ‘तालुका प्रसिद्धी प्रमुख’ पदावर नियुक्त!



मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची प्रेरणादायी कार्यशैली आत्मसात करत, शिवसेना पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी मुक्ताईनगरात दोन महत्त्वाच्या पदांवर नव्या दमदार नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून आणि शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या:

 संतोष सुपडू मराठे (नगरसेवक व पत्रकार) – जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (रावेर लोकसभा कार्यक्षेत्र)

 निलेश मोहन मेढे – मुक्ताईनगर तालुका प्रसिद्धी प्रमुख

या दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या स्वाक्षरीनिशी नियुक्तीपत्र सुपूर्द करून करण्यात आली. या नेमणुकीमुळे मुक्ताईनगर तालुका व रावेर लोकसभा क्षेत्रात शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर मोठा उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सत्कार समारंभात मान्यवरांची उपस्थिती

या निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मा. चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे कार्याध्यक्ष अफसर खान, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नितीन जैन आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रसिद्धी आणि पक्षवाढीचा नवा ध्यास

शिवसेनेच्या प्रचार-प्रसाराला नवसंजीवनी देणे, पक्षाच्या लहान-थोर उपक्रमांची इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामध्ये प्रभावी प्रसिद्धी करणे, तसेच जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहचवणे ही जबाबदारी आता मराठे आणि मेढे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत बोलताना, दोन्ही नवनीयुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी तन-मन-धन अर्पण करून कार्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला असून, स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मिळणारे पाठबळ व सहकार्य आपल्या कार्याला अधिक गती देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

No comments