हातेड खु ग्रामपंचायत व इफको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमीत वृक्ष लागवड.... विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गा...
हातेड खु ग्रामपंचायत व इफको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमीत वृक्ष लागवड....
विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेड खु ग्रामपंचायत ने तेथील स्मशानभूमीत नागरिकांची सोय व्हावी म्हणून गेल्या दोन वर्षात शेकडो वृक्ष लागवड सरपंच सौ शालिनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.यावर्षी देखील इफ्को ह्या खत कंपनीने निंबाचे वृक्ष उपलब्ध करून दिल्याने श्री शिवाजी हायस्कूल हातेड च्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने नवीन लागवड केली.यावेळी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील,सूतगिरणी संचालक रमेश सोनवणे, माजी उपसरपंच पंडित पौलाद कोळी, ग्रा सदस्य निरंजन सोनवणे,राजेंद्र सोनवणे, सुनील कोळी,देवानंद शिरसाठ,योगेश शिरसाठ,योगेश पावनकर श्री शिवाजी हायस्कूलचे श्री महेंद्र बोरसे,श्री संदीप सोनवणे,श्री ए व्ही मोरे , श्री पी ए पाटील हजर होते.

No comments