ई-चलान कारवाईदरम्यान खासगी मोबाईलचा वापर थांबवण्याचे पोलीस महासंचालकांचे निर्देश मुंबई वृत्तान्त (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वाहतूक पोलीस अ...
ई-चलान कारवाईदरम्यान खासगी मोबाईलचा वापर थांबवण्याचे पोलीस महासंचालकांचे निर्देश
मुंबई वृत्तान्त
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी ई-चलान कारवाई करताना खासगी मोबाईल फोनवरून फोटो/व्हिडिओ न घेता, शासनाद्वारे मंजूर केलेल्या अधिकृत "रीअल टाइम मोबाईल चालान प्रणालीचा" वापर करावा, असा स्पष्ट आदेश अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिला आहे.
दिनांक 02/03/2024 रोजी मा. परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे झालेल्या वाहतूक संदर्भातील बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली होती. यावेळी नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये, तसेच कोणताही गैरवापर टाळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या खासगी मोबाईलचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
-----------------------------------------------------
🧾 प्रमुख निर्देश:
वाहतूक पोलिसांनी ई-चलान करताना कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या खासगी मोबाईलवर फोटो/व्हिडिओ घेऊ नये.
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या real-time चालान मोबाईल प्रणालीचाच वापर करावा.
नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी/अंमलदारांविरुद्ध प्रशासकीय शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल.
No comments