मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशन तर्फे वह्या वाटप विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव-येथील मुन्नादेवी आणि ...
मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशन तर्फे वह्या वाटप
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव-येथील मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशन च्या वतीने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव सी.के.पाटील विराजमान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून 'श्रीजी'जिनिगचे संचालक, उद्योजक व मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष जीवनसिह अप्पा बयस उपाध्यक्ष-तेजेंद्रसिह चंदेल, सचिव मुकेशसिह बयस,संचालक धिरेंद्र पुरभे, प्राचार्या सुरेखा पाटील,आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे,माजी पर्यवेक्षक राजेंद्र पडोळ,पर्यवेक्षक ए. एस.पाटील मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांना मोफत वह्या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या याप्रसंगी जीवन अप्पा बयस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले"तुमच्या स्वप्नातील पंखांना ज्ञानरुपी बळ मिळो'असे गौरवोद्गार काढले, यावेळी प्राचार्या सुरेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सी.के.पाटील यांनी संस्थेचा चढउताराचा लेखा-जोखा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी केले प्रस्ताविक माजी पर्यवेक्षक राजेंद्र पडोळ यांनी केले तर आभार ऍड कुलदीपसिह चंदेल यांनी मानले

No comments