हिंगोणे येथे कृषीदूतांकडून मोसंबी लागवडीचं प्रात्यक्षिक यावल (प्रतिनीधी ) शब्बीर खान (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्रामीण कृषि जागरूकता अ...
हिंगोणे येथे कृषीदूतांकडून मोसंबी लागवडीचं प्रात्यक्षिक
यावल (प्रतिनीधी ) शब्बीर खान
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रामीण कृषि जागरूकता अणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील शिरीष कांबळे, प्रज्वल पाटील, तेजस वेताळ, ओम स्वामी, प्रथमेश शेळके व आदित्य पवार ह्या कृषिदूतांनी, हिंगोणे गावामध्ये फलोत्पादन विषयाअंतर्गत मोसंबी या बागायती पिकाची शास्त्रीय पद्धतीने कशी लागवड करावी, दोन्ही झाडांमधील अंतर व दोन्ही ओळी मध्ये किती अंतर ठेवावं व मोसंबी पिकाच्या वाढीसाठी कोणती खते द्यावेत, किती फुटावर खड्डे घ्यावेत आणि रोप लावल्यावर माती कशी भरावी याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतात आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय पाचारणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड व विविध विषयातील विषय विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले होते.

No comments