पाडळसे लोक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; शेखर तायडे उपाध्यक्षपदी निवड भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
पाडळसे लोक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; शेखर तायडे उपाध्यक्षपदी निवड
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाडळसे (ता. यावल) - येथील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित लोक विद्यालय पाडळसे येथे आज, दि. २५ जुलै रोजी पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या प्रगती आणि शाळेच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी ही सभा उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. बी. पवार होते. यावेळी संस्थेचे संचालक आर. व्ही. पाटील, गोपाळ पाटील, विनायक पाटील, युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकांकडून खेमचंद कोळी, विजय तायडे, हरून पठाण, ज्ञानेश्वर तायडे, सुपडू भोई, किरण भोई उपस्थित होते. तसेच, शिक्षक एस. आर. भोई, आर. टी. चौधरी, एल. बी. कोळी, मयूर चौधरी आणि शिक्षिका एस. आर. इंगळे मॅडम, बी. एस. पाटील मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
या सभेत शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षपदी शेखर पंढरीनाथ तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच, लोकसहभागातून शाळेतील विद्यार्थ्यांना आरओ (RO) प्लांट बसवण्याबाबत खेमचंद कोळी यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना मांडली. या सूचनेवर सकारात्मक चर्चा झाली. सभेचे आभार प्रदर्शन आर. बी. कोरपावलीकर यांनी केले. ही सभा पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय वाढवणारी ठरली असून, शाळेच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.
No comments