मीरा-भाईदरला मिळाले योग्य भाषेत उत्तर देणारे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी स्वीकारला पदभार..!! सौ. स्नेहल तांबोळी ( मीरा-वसई ) प्रतिनिधी...
मीरा-भाईदरला मिळाले योग्य भाषेत उत्तर देणारे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी स्वीकारला पदभार..!!
सौ. स्नेहल तांबोळी ( मीरा-वसई ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मीरा-भाईदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयात मोठा बदल करण्यात आला आहे. सध्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी निकेत कौशिक हे मीरा-भाईंदर वसई विरार शहरांचे नवे पोलीस आयुक्त म्हणून गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला आहे. याबाबत बुधवारी राज्यांच्या गृह विभागाने शासन आदेश जारी करत मीरा-भाईंदरचे विद्यमान पोलीस आयुक्त मधुकर पांडेची अप्पर पोलीस महासंचालक ( प्रशासन ) येथे बदली केली आहे. तर त्यांच्या जागी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेले निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 19 94 बॅचच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी निकेत कौशिक हे यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात ( एसीबी ) अतिरिक्त महासंचालक ( एडीजी ) म्हणून कार्यरत होते. मूळचे हरियाणाचे असलेले आयपीएस अधिकारी निकेत कौशिक यांनी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्तपदे भूषवली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हाय प्रोफाईल अंडरवर्ल्डशी संबंधित दहशतवादी निगडित गुन्ह्यांचा छडा लावला आहे. बॉलीवूड अभिनेता शाइनी आहुजा बलात्कार प्रकरणातही अटकेची कारवाई निकेत कौशिक यांच्या नेतृत्वाखालीच करण्यात आली होती. मीरा-भाईंदर वसई विरार क्षेत्र हे गुन्हेगारी दृष्टिकोनांतून नेहमीच एक आव्हानात्मक क्षेत्र मानलं जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मीरा-भाईंदरला योग्य भाषेत उत्तर देणारे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. तर विद्यमान पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना मराठी मोर्चाला परवानगी न देणं भोवलं आहे. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी राज्यांच्या गृह विभागाने परिपत्रक काढले आहे. आणि नव्या पोलीस आयुक्तांनी गुरुवारी दुपारी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
No comments