एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी.चोरटे फरार. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - एरंडोल येथील मारीमाता चौकातून आज पहाटे ती...
एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी.चोरटे फरार.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- एरंडोल येथील मारीमाता चौकातून आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घरासमोरील मोकळ्या जागेत लावण्यात आलेले ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे.डीझेल संपल्याने ट्रॅक्टरला रस्त्यावरच उभे करून चोरटे पसार झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भर रस्त्यावर बचत गटाच्या महिला पदाधिका-यांचे सुमारे साडेचार लाख रुपयांची अज्ञात चोरट्यांनी लुट केली असून दुस-याच दिवशी पहाटे ट्रॅक्टरची चोरी करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
याबाबत माहिती अशी,की मरीमाता चौकातील रहिवासी विनोद सुरेश खंदारे हे निलेश चावरिया यांचेकडे ट्रॅक्टरवर चालक असून त्यांनी राहत्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेवर काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर लावले होते.आज पहाटे तीन वाजता विनोद खंदारे यांना जाग आली असता त्यांनीघराबाहेर येवून पाहिले असता त्याना ट्रॅक्टर नसल्याचे दिसून आले.ट्रॅक्टर जागेवर न दिसल्यामुळे विनोद खंदारे यांनी मालक निलेश चावरिया यांना घटनेची माहिती दिली.विनोद खंदारे यांनी त्यांचे भाऊ गणेश खंदारे यांचेसह मुख्तारखान बादलखान,उत्तम भिल यांनी हे ट्रॅक्टरच्या शोधासाठी निघाले.गालापूर,ताडे परिसरात ट्रॅक्टरचा शोध घेत असतांना त्यांनी किरण पाटील यांना चोरीबाबत माहिती दिली.समाधान पाटील यांनी सदरचे ट्रॅक्टर
समाधान अनिल पाटील व ललित आनंदा महाजन हे घेवून जात असल्याचे आपण पाहिले असून ललित आनंदा महाजन हा ट्रॅक्टर चालवत होता असे सांगितले.ट्रॅक्टरचे डीझेल संपल्याने चोरट्यांनी ते रस्त्यावरच उभे केले.पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून फरार झालेल्या चोरट्यांचा शोध घेत आहेत.याबाबत विन्प्द खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
करण्यात आला असून हवालदार दीपक पाटील तपास करीत आहेत.दरम्यान शहरात कालदुपारी चार वाजता भर रस्त्यातून महिला बचत गटाच्या पदाधिका-यांकडे असलेली ४ लाख ६० हजार रुपयांची पैशांची थैली मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी. लुटून नेली असून चोवीस तासाच्या आत ट्रॅक्टर चोरीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीच्या वेळेस काही युवक गटागटाने फिरत असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
No comments