विज्ञान बोध वाहिनीचे पाच ऑगस्टला निलंग्यात उदघाटन.. महाराष्ट्र दौरा सुरू! लातूर,दि.३१ उत्तम माने (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लातूर :- वि...
विज्ञान बोध वाहिनीचे पाच ऑगस्टला निलंग्यात उदघाटन.. महाराष्ट्र दौरा सुरू!
लातूर,दि.३१ उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर :- विज्ञान बोध वाहिनी ही महाराष्ट्र अंनिसची फिरती प्रबोधन गाडी आहे. जी केवळ शाळांमध्ये खगोलशास्त्र,चमत्कार प्रात्यक्षिक,वयात येताना या विषयावर कार्यक्रम घेते.या गाडीत खगोलशास्त्र समजून संगण्यासाठी एक डोम असून ज्यात 3D मध्ये ग्रह आणि तारे दाखवले जातात. ग्रह व तारे यांची ओळख,त्यावरील वातावरण आणि त्याचे स्थान याची माहिती डोम मध्ये दिसणार आहे. आपण ग्रहावर आहोत असे आपल्याला जाणवणार आहे.चमत्कार प्रात्यक्षिक आणि वयात येताना हे दोन्ही विषय कार्यकर्ते व्याख्यानाच्या माध्यमातून घेतात.
व्यसनमुक्ती वरील पोस्टर प्रदर्शन सहित ऐकून विज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. या विज्ञान बोध वहिनीचे दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील मातोश्री सभागृहात सकाळी ११ वाजता उदघाटन होणार असून नविन तरुण पिढी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून विद्यार्थ्यांना विज्ञान व विवेक याची सांगड घालून राष्ट्र हिताच्या कार्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. यामध्ये सूर्यग्रहण,चंद्रग्रहण, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली याची माहिती अत्याधुनिक अश्या 3D नभांगन मध्ये दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटण महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.माधव बावगे तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सोमनाथ रोडे हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी,समाज सेवक लक्ष्मीकांत सोमाणी, महाराष्ट्र अंनिसचे राज्य सहकार्यवाह बाबा हुलकुडे, निलंगा कार्याध्यक्ष पत्रकार मोहन क्षिरसागर,लातूर शहर अध्यक्ष डॉ.गणेश गोमारे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. दशरथ भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम निलंगा येथून सुरुवात होऊन दोन महिने लातूर जिल्ह्यात चालणार असून या कार्यक्रमांतर्गत ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक व विवेकी विचार पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अजित निंबाळकर व जिल्हा उपाध्यक्षा सौ.सुनीताताई आरळीकर यांनी केले आहे.
No comments