हद्दपार केलेले दोघे शहरातच...स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर...
हद्दपार केलेले दोघे शहरातच...स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.६ ):-मोहरम सण उत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग दरम्यान जिल्ह्यातुन हद्दपार केलेले 02 सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी मोहरम सण-उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना नगर शहरातील सराईत गुन्हेगारांना चेक करुन,हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शहरामध्ये शोध घेऊन,02 सराईत गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरूध्द तोफखाना पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.असद गफ्फार शेख,वय 35, रा.दर्गादायरा रोड,मुकूंदनगर, अहिल्यानगर, सलमान मेहबुब खान,वय 31,रा.कोठला, घासगल्ली,अहिल्यानगर असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संदीप पवार,शिवाजी ढाकणे,अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ,रणजीत जाधव, बाळासाहेब खेडकर यांनी केलेली आहे.

No comments