adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांकडून आंबोली फाटा येथे रास्ता रोको

  रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांकडून आंबोली फाटा येथे रास्ता रोको  प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्यंबके...

  रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांकडून आंबोली फाटा येथे रास्ता रोको 


प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे परंतु या कामाचा दर्जा निकृष्ट असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे फाटा ते खरवळ हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक  योजनेतून7.340 कि.मी. हा रस्ता करण्यात आला आहे या रस्त्याच्या कामाचा चांगला दर्जा नसल्यामुळे आंबोली फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला. बेळंजे फाटा ते खरवळ रस्त्याला काही ठिकाणी गटारी खोदल्या नसत्याने पाणी पूर्ण रस्त्यावर येत आहे  येथील मुख्य रस्त्यावर पहिल्याच पावसामध्ये खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यात पाणी साचून गटारे तयार झाली आहेत. मात्र अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील संतप्त गावकऱ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करुन शासन आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.


हेदुलीपाडा, नांदगाव कोहोळी,वारसविहीर,खरवळ या गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत व पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे एसटी बस सेवा ही बंद आहे त्यामुळे शाळेतील मुलांना व नागरिकांना गैरसोय होत आहे. मोठ्या गाड्यांना या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे.  रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, यासाठी  संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्याच फोटो, व्हिडिओ तयार करुन सोशल माध्यमावर टाकले.पण यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याने हेदुलीपाडा, नांदगाव कोहोळी, वारसविहीर, खरवळ येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.जोपर्यंत हा रस्ता दुरूस्ती करणार नाही, तोपर्यंत हा रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन देत नाही जोपर्यंत  रस्ता रोको चालूच राहणार पण काही वेळातच पंतप्रधान ग्रामसडक योजना, बांधकाम विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन लेखी आश्वासन दिले पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्त करून देऊ असे सांगण्यात आले आणि आंदोलन मागे घेण्यात आले.

No comments