adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांना औषध वाटप

  पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांना औषध वाटप  भरत कोळी यावल ता प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल  :-  आषाढी एकादशी  निमित्ताने मनवे...

 पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांना औषध वाटप 


भरत कोळी यावल ता प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल  :-  आषाढी एकादशी  निमित्ताने मनवेल ते पंढरपूर साठी यावल आगाराच्या वतीने दरवर्षी एस. टी.बसचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा मनवेल वरून पंढरपूर साठी बस आज सकाळी ७ वाजता ४० वारकरी विठ्ठल भक्तांना घेऊन रवाना झाली. 

  सदर मनवेल येथील भाविक विठ्ठल भक्त वारकरी यांना आमदार अमोलदादा जावळे मित्र परिवार व भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. सुनिल पाटील साकळीकर यांनी प्रवासात लागणारी प्राथमिक औषधी दिली. त्याचप्रमाणे मनवेल येथून पंढरपूर जाणाऱ्या या बसची श्रीफळ फोडून, पुष्पहार अर्पण केला व बसचालक, बसवाहक यांचा सत्कार केला, तसेच बसमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. पांडुरंग परमात्माचे दर्शन आपले सर्वांचे लवकरच होवो अशी सदिच्छा डॉ. सुनिल पाटील व्यक्त केली. प्रवासात लागणारी औषधी देत प्रवासात व वारीत आरोग्याबाबत घेण्याची काळजी याबद्दल माहिती दिली. 

 मनवेल वरून पंढरपूर जाणारी आज ही दुसरी बस होती. अजून येणाऱ्या तीन दिवसांनी तिसरी बस जाणार आहे. मनवेल गाव यावल तालुक्यातील अध्यात्मिक अधिष्ठान असलेले गाव आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने मनवेल वरून पंढरपूर जातात. त्याचप्रमाणे महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगर, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने  श्री दादाजी धाम,खंडवा, मध्यप्रदेश येथे व अंबाडा येथे भाविक पायी जातात.

या मनवेल- पंढरपूर बससेवा नियोजन साठी मनवेल येथील यावल आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री. सी. आर. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. 

 श्री.  आप्पासाहेब हिरामण माणिक पाटील, महेंद्र पाटील, वसंतनाना पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, मिनेश कोळी, गणेश कोळी, पंढरीनाथ पाटील, किशोर पाटील, सोपान जाधव, पन्नालाल पाटील, दिगम्बर जाधव यांसह भाविक भक्त, वारकरी, नागरिक उपस्थित होते.

No comments