यावल महाविद्यालयात विद्यार्थी विकास अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चेकचे वितरण भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
यावल महाविद्यालयात विद्यार्थी विकास अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चेकचे वितरण
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे दिनांक 4/7/25 रोजी प्राचार्य संध्या सोनवणे मॅडम उपप्राचार्य खैरनार सर यांच्या हस्ते विद्यार्थी विकास अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून चेक देण्यात आले यात लाभार्थी विद्यार्थी म्हणून अजय युवराज लोधी, रोहित जहागीर तडवी, दीपक बाविस्कर, गायत्री घुले, पाटील मेघा, जयश्री धनगर, दुर्गा पाटील इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. एच. जीं. भंगाळे सर, मा जी उपप्राचार्य. डॉ एस पी कापडे सर डॉ. आर डी पवार सर, डॉ. पी व्ही. पावरा सर, नरेंद्र पाटील सर, इमरान खान सर, प्रतिभा रावते मॅडम आदी उपस्थित होते
No comments