जुगार अड्डयावर कोतवाली पोलिसांचा छापा..लाखोंचा मुद्देमाल हस्तगत सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.९):-कोत...
जुगार अड्डयावर कोतवाली पोलिसांचा छापा..लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.९):-कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,बुरुडगाव रोड येथील लंकेश हर्षा यांचे खोलीत,समर्थनगर,नक्षत्र लॉन, येथे काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित असुन आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी अशी माहीती मिळाल्याने पोनि.दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड यांना पोलीस स्टाफ व पंचासह बातमीतील नमुद ठिकाणी जावुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले असता नमूद ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन सायंकाळी छापा टाकुन कारवाई केली.पोलीसांनी पंचासमक्ष कारवाईत तिरट नावाचे जुगाराचे साहित्य,रोख रक्कम,15 मोबाईल फोन,03 चारचाकी वाहने व 03 मोटारसायकल असा एकुण- 30,50,350/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला असुन आरोपी नामे- 1)मंगेश तुकाराम चव्हाण, वय-32 वर्षे, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, 2) योगेश भाऊसाहेब बांडे, वय-20 वर्षे, रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, 3) संदिप कारले, वय-36 वर्षे, रा. केडगाव, अहिल्यानगर, 4) आरिफ हुसेन पठाण, वय-32 वर्षे, रा. भवानीनगर, सारसनगर, अहिल्यानगर, 5) संदिप किसन हरेर, वय 36 वर्षे, रा. फुलसुंदर मळा, अहिल्यानगर, 6) परमेश्वर जयराम जंगम, वय-42 वर्षे, रा. बुरुडगाव, ता.जि. अहिल्यानगर, 7) सलमान बशीर शेख, वय-33 वर्षे, रा. समर्थनगर, अहिल्यानगर, 8) भाऊसाहेब रामभाऊ भोसले, वय-55 वर्षे, रा. बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहिल्यानगर, 9) विनोद कैलास निस्ताने, वय-32 वर्षे, रा. चर्च रोड, परदेशी गल्ली, अहिल्यानगर, 10) भुषण बाबासाहेब बोरुडे, वय-27 वर्षे, रा. बोरुडे मळा, अहिल्यानगर, 11) सुदर्शन गोरख सुपेकर, वय-33 वर्षे, रा. बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहिल्यानगर, 12) अश्विन आप्पा दिवटे, वय-27 वर्षे, रा. बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहिल्यानगर, 13) ज्ञानेश्वर अरुण बिचारे, वय-26 वर्षे, रा. कर्जुले हरीया, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, 14) विश्वजीत उत्तम थोरात, वय-27 वर्षे, रा. वडगाव तांदळी, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे, 15) अक्षय युवराज रजपुत, वय-27 वर्षे, रा. वडगाव तांदळी, आळेफाटा, ता. जुन्नर, जि.पुणे यांचे विरुध्द पोकॉ.महेश सुभाष पवार यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनला गु.र.नं. 629/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई/कृष्णकुमार सेदवाड हे करीत आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड,पोहेकॉ/बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी,सलीम शेख, विनोद बोरगे,विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके,पोकॉ/सत्यजीत शिंदे,अमोल गाडे,अतुल काजळे, सोमनाथ केकाण,महेश पवार, शिरीष तरटे,सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर,प्रतिभा नागरे यांनी केली आहे.
No comments