adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दहिगाव चे प्रति पंढरपूर मानले गेलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल फराळ वाटप होणार

  दहिगाव चे प्रति पंढरपूर मानले गेलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल फराळ वाटप होणार  भरत कोळी यावल ता.प्...

 दहिगाव चे प्रति पंढरपूर मानले गेलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल फराळ वाटप होणार 



भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दहिगाव ता यावल येथील प्रसिद्ध असलेले दीडशे वर्षाच्या वरती इतिहासाचे श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल साबुदाणा फराळ व अनेक सेवाभावी संघटना तर्फे केळ आणि चहा वाटप केली जाणार आहे सन 1998 मध्ये 25 लाख खर्च करून बांधलेले परिसरातील भव्य मोठे विठ्ठल रुक्माई मंदिर येथे उभारण्यात आले आहे सालाबाद प्रमाणे मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने यात्रोत्सव पार पडतो हजारो भाविक परिसरातून येथे दर्शनासाठी येत असतात तर जळगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी येथे येऊन दिवसभर भजने भारुडे गात असतात मंदिर उभारण्याकरिता संस्थेचे ट्रस्ट अध्यक्ष सुरेश देवराम पाटील ग्रामपंचायतचे माजी सदस्य हेमराज महाजन कैलासवासी धागो पाटील प्रकाश सोनार आत्माराम महाजन अनेक प्रतिष्ठ गावकऱ्यांनी निधी जमा करण्याकरता परिश्रम घेतले होते मंदिर उभारण्यापासून दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रोत्सव पार पडतो गावकऱ्यांच्या परिश्रमातून फराळ वाटप केला जातो काही संघटना रक्तदान शिबिर घेतात तर काही केळ वाटप चहा वाटप करीत असतात श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात सकाळी पाच वाजेपासून श्री विठ्ठल रुक्माई ची पूजाअर्चा केली जाईल होम पूजन करिता संगीता तुषार माळी धनश्री गौरव पाटील दिपाली अक्षय रत्नपारखी सपना अविनाश पाटील आश्विनी सचिन मगरे निकिता मयूर पवार या नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते पूजन केले जाईल मंदिर सजावटीसाठी सागर चौधरी बंटी पाटील शैलेंद्र पाटील व ट्रस्टचे सचिव कैलास पाटील परिश्रम घेत आहेत दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील हरिभक्त परायण भजनी मंडळी दहिगाव यांनी केले आहे

No comments