adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल!  पुणे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राज्याचे सार्वजनिक ...

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल! 



पुणे प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत तळेगाव–चाकण–शिक्रापूर (NH-548D) या अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक मार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातवाढ आणि रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली.

🔸रस्त्याची एकूण लांबी – ५३.२०० किमी

🔸तळेगाव–चाकण भाग – २८.३०० किमी

🔸मावळ तालुक्यातील लांबी – १२.५८० किमी

हा रस्ता पुणे–मुंबई, पुणे–नाशिक आणि पुणे–संभाजीनगर या तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडतो. तसेच तळेगाव, चाकण आणि रांजणगाव औद्योगिक क्षेत्र आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हजारो कंटेनर वाहतुकीसाठी हा मुख्य मार्ग आहे.या मार्गावरून दररोज अवजड औद्योगिक वाहने, भाजीपाला व शेती उत्पादनांची वाहतूक, स्थानिक विद्यार्थी, कामगार व खासगी वाहनांची मोठी वर्दळ होत असते.

🔸सध्यस्थिती:

- संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे

- पावसामुळे चिखल व रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण

- अवजड वाहनांची वाढलेली संख्या

- ठराविक वेळेची बंधने मोडणारी वाहतूक

- वाढते अपघात 

No comments