adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावित्रीबाई फुले विद्यालयात सर्पमित्र सचिन गिरी यांचा सापा विषयी समज गैरसमज यावर प्रबोधनत्मक कार्यक्रम संपन्न

 सावित्रीबाई फुले विद्यालयात सर्पमित्र सचिन गिरी यांचा सापा विषयी समज गैरसमज यावर प्रबोधनत्मक कार्यक्रम संपन्न  जावेद शेख / राहुरी: (संपादक ...

 सावित्रीबाई फुले विद्यालयात सर्पमित्र सचिन गिरी यांचा सापा विषयी समज गैरसमज यावर प्रबोधनत्मक कार्यक्रम संपन्न 



जावेद शेख / राहुरी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे सर्पमित्र सचिन गिरी यांनी सापा विषयी समज गैरसमज बाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

 सापांच्या विविध जातींची माहिती देतबिनविषारी साप व विषारी साप कसा ओळखावा ही माहिती विद्यार्थ्यांना दिली . त्याचबरोबर सापांची राहण्याची जागा, खाद्य , याबाबत सांगताना सर्वात जास्त उंदीर हे सापाचे आवडते खाद्य आहे.

यांची संख्या वाढली तर अन्नधान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होईल म्हणून उंदीर संख्या कमी करण्याकरिता निसर्गामध्ये साप  हे उपयुक्त आहेत म्हणून  साप हा आपला शत्रू नसून तो मित्र आहे सापांना न मारता सर्पमित्रांना बोलवून निसर्गात त्यांना मुक्त करावे असे आवाहान त्यांनी यावेळी केले.

जर चुकून सर्पदंश झालाच तर कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही मांत्रिकाकडे न जाता योग्य तो औषधोपचार करावा , यामुळे निश्चित पेशंटला  जीवदान मिळते .सापांचे विष हे विविध औषधात गुणकारी आहे .त्यामुळे विषारी सापही निसर्गात  जगणे  महत्वाचे आहेत. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सापांविषयीचे समज गैरसमज व मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थी वर्ग आनंदीत झाला. विद्यार्थ्यानी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले, सापा विषयी गैरसमज दूर व्हावे कारण सापांविषयी असणाऱ्या सर्व अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत त्या आज सर्पमित्र सचिन गिरी यांनी दूर केल्या. साप दूध कधीच पीत नाही हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे तसेच सर्प दंश झाल्यास संबंधित व्यक्तीला दवाखान्यात नेणे आवश्यक आहे.

प्रत्येक गावात सर्पमित्र तयार व्हावेत असे प्रतिपादन त्यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा, जितेंद्र मेटकर, वसंतराव झावरे, किरण गायकवाड, हलीम शेख , तुकाराम जाधव, संतोष जाधव , घनश्याम सानप , अनघा सासवडकर ,सुरेखा टेमकर ,संगीता नलगे , गोकुळ ठाकुर ,बाबासाहेब शेलार इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी मांडले.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments