adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुसखेडा येथील गरीब विद्यार्थीनीला पुण्यातील नगरसेवकाने स्वीकारले पालकत्व आर्थिक मदत देवून शिक्षणाची घेतली जबाबदारी

'दुसखेडा येथील गरीब विद्यार्थीनीला पुण्यातील नगरसेवकाने स्वीकारले पालकत्व आर्थिक मदत देवून शिक्षणाची घेतली जबाबदारी   भरत कोळी यावल ता.प...

'दुसखेडा येथील गरीब विद्यार्थीनीला पुण्यातील नगरसेवकाने स्वीकारले पालकत्व

आर्थिक मदत देवून शिक्षणाची घेतली जबाबदारी  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल : तालुक्यातील दुसखेडा येथील स्व. डी.डी.सोनवणे माध्यमिक विद्यालयची विद्यार्थिनी कोमल संजय सपकाळे येणे मार्च २५ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून विद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एका सामान्य शेतमजूर कुटुंबातून आलेल्या कोमलने आपल्या मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केल्याने गाव आणि परिसरात तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. 

   गावचे रहिवासी तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक  अशोकभाई सोनवणे यांना कळाल्यानंतर त्यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेऊन तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून धनादेश देऊन त्यांनी कोमलचे अभिनंदन करून तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा आणि मदतीचा हात दिला आहे. कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, आई वडील अत्यंत गरिबीत शेतमजुरी करीत असताना कोमल सोनवणे हिने मिळवलेले  यश हे नक्कीच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बिकट असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीमागे समाजातल्या दानशूर दात्यांनी आर्थिक बळ उभा करून अशा मुला-मुलींना शैक्षणिक मदत केल्यास भविष्यात ते नक्कीच समाज व देशाची सेवा करतील असे उदगार श्री सोनवणे यांनी याप्रसंगी काढले. यावेळी  दिव्यांग सेनेचे विशाल दांडगे, पोलीस पाटील सौ. संगीता दांडगे उपस्थित होते याप्रसंगी कोमलचे अभिनंदन करून तिला पुढील शैक्षणिक यशासाठी मनःपूर्वक  शुभेच्छा दिल्यात.

No comments