नांदुरा रोडवर रस्त्याच्या मधोमध एक भलामोठा पडलेला खड्डा बुजवा -:- प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप अमोल बावस्कार बुलढाणा (संप...
नांदुरा रोडवर रस्त्याच्या मधोमध एक भलामोठा पडलेला खड्डा बुजवा -:- प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर -:-शहरातील अनके रस्त्यांची अवस्था पहिल्या पावसात दयनीय अशी झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वर्दडीचा रस्ता असलेल्या नांदुरा रोडवर तर रस्त्याच्या मध्यभागी भलामोठा खड्डा पडल्याने हा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग - श्रेणी १ मलकापूर यांनी याकडे तातडीने लक्ष देवून तो खड्डा बुजविण्यात यावा, अन्यथा त्या खड्ड्यात बेशरमचे झाड लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिला आहे.
शहरातील नांदुरा रोड हा अत्यंत वर्दडीचा मार्ग. या रस्त्याने नांदुरा, खामगावकडे जाणारी वाहने तसेच इतर लहान-मोठ्या गावांकडे जाणार्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्याचप्रमाणे या मार्गावर शाळा सुध्दा असल्याने विद्यार्थ्यांची सुध्दा मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र सदर नांदुरा रोडवर रस्त्याच्या मधोमध एक भलामोठा खड्डा पडला असून याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सदर खड्डा चुकवितांना वाहनधारकांचे संतुलन जावून एखाद्यावेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या खड्ड्यामध्ये पावसाळ्याचे पाणी साचल्याने वाहन धारकांना दुसरीकडून जाण्यास रस्ताच नसल्याने या खड्ड्यातून वाहन काढतांना आजू-बाजूच्या नागरिकांच्या अंगावर या खड्ड्यातील पाणी उडत आहे. त्यामुळे वादही निर्माण होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग - श्रेणी १ मलकापूर यांनी सदरचा खड्डा तात्काळ बुजवून रस्त्यावरील इतरही खड्ड्यांची दुरूस्ती करावी, अन्यथा त्या खड्ड्यात बेशरमचे झाड लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.

No comments